Raja Raja Chola: 'तामिळनाडू अस्तित्वात नव्हते, मग राजराजा 'द्रविडीयन' कसे झाले?', भाजप नेत्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 02:03 PM2022-10-10T14:03:57+5:302022-10-10T14:04:58+5:30

राजराजा चोल हिंदू नव्हते, असे विधान कलम हसन यांनी केले. त्याला भाजप नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे.

Raja Raja Chola: 'Tamil Nadu didn't exist, then how did Raja Raja become 'Dravidian'?', asks BJP leader | Raja Raja Chola: 'तामिळनाडू अस्तित्वात नव्हते, मग राजराजा 'द्रविडीयन' कसे झाले?', भाजप नेत्याचा सवाल

Raja Raja Chola: 'तामिळनाडू अस्तित्वात नव्हते, मग राजराजा 'द्रविडीयन' कसे झाले?', भाजप नेत्याचा सवाल

googlenewsNext

Raja Raja Chola: भाजपचे संघटन सचिव बीएल संतोष यांनी रविवारी अभिनेते कमल हसन यांच्यावर निशाणा साधला आहे. कमल हसन यांनी चोल साम्रज्यातील राजराजा चोल यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून ते हिंदू नसल्याचे म्हटले होते. संतोष यांनी हसन यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत म्हटले की, चोल राजे राज्य करत असलेल्या तामिळनाडूची संकल्पनाच नव्हती, मग राजराजा चोल 'द्रविडीयन' राजा कसा झाला? 

भाजप नेत्याचे प्रत्युत्तर
बीएल संतोष म्हणाले की, 'तामिळनाडूमध्ये बृहदीश्वर मंदिर बांधणारा राजाराजा चोल होता. मूर्ख लोकांनी राजराजा चोल हिंदू होता की नाही, असा वाद सुरू केला आहे. त्या काळात तामिळनाडूच नव्हते. त्या वेळी चोल वंश, पल्लव वंश आणि पांड्य वंश होते. मग राजाराजा चोल द्रविड राजा कसा झाला? द्रविड समस्या ही राजकीय समस्या आहे. द्रविड मुद्दा हा स्वार्थी राजकारणासाठी वापरला जातो', असे प्रत्युत्तर संतोष यांनी दिले.

संबंधित बातमी- शेकडो मंदिरे बांधणारे चोल राजे हिंदू नव्हते? कमल हसन यांच्या दाव्यात किती तथ्य..?

काय आहे नेमकं प्रकरण?
कमल हसनच्या आधी दिग्दर्शक वेत्रीमारन म्हणाले होते की, 'आमची चिन्हे आमच्याकडून हिसकावून घेतली जात आहेत. वेल्लूरचे भगवेकरण आणि राजराजाला हिंदू राजा म्हणणे, हे त्याचेच उदाहरण आहे. सिनेमा हे सर्वसामान्यांसाठीचे माध्यम असल्याने लोकप्रतिनिधीचे रक्षण करण्यासाठी राजकारण समजून घेणे गरजेचे आहे', असा इशारा वेत्रीमारन यांनी दिला. यावर भाजप नेते एच राजा म्हणाले होते की, मला जास्त इतिहास माहित नाही, पण वेट्रीमारण यांनी राजाराजा चोलने बांधलेल्या चर्च आणि मशिदी दाखव्यावात. 

कलम हसन यांचे समर्थन
अभिनेते-राजकारणी कमल हसन यांनी दिग्दर्शक वेत्रीमारनचे समर्थन केले होते. ते म्हणाले की, 'ज्या वेळी राजराजा चोल राज्य करत होते, तेव्हा हिंदू धर्माचे नाव नव्हते. त्यावेळी वैनवम्, शिवम् आणि समनम् होते. वैष्णव आणि शैव यांना सामूहिकरित्या काय म्हणावे, हे इंग्रजांना माहित नव्हते. त्यामुळेच हिंदू हा शब्द ब्रिटिशांनी दिला होता. आठव्या शतकात अनेक धर्म आणि लोकांच्या विविध गोष्टींवर श्रद्धा होत्या.'
 

Web Title: Raja Raja Chola: 'Tamil Nadu didn't exist, then how did Raja Raja become 'Dravidian'?', asks BJP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.