राजभवनला जुने वैभव मिळवून दिले - वांच्छू
By admin | Published: July 6, 2014 01:14 AM2014-07-06T01:14:01+5:302014-07-06T01:14:01+5:30
मी राज्यपाल बनून गोव्यातील राजभवनवर आलो तेव्हाच राजभवन इमारतीच्या संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे अतिशय योग्यवेळी मी राजभवनवर पोहोचलो.
Next
राजू नायक /सद्गुरू पाटील
- काबो (राजभवन)
मी राज्यपाल बनून गोव्यातील राजभवनवर आलो तेव्हाच राजभवन इमारतीच्या संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे अतिशय योग्यवेळी मी राजभवनवर पोहोचलो. त्यानंतर मी राजभवनला जुने वैभव मिळवून देण्यासाठी बराच वेळ दिला. त्यादृष्टीने मी बरेच योगदान दिले, अशा शब्दांत राज्यपाल भारत वीर वांच्छू यांनी शनिवारी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
मी आयुष्यात पत्रकारांपासून कायम दूर राहिलो; कारण माझा पूर्वीचा जॉब हा हायप्रोफाईल होता आणि माझा स्वभाव हा पूर्णत: खासगी स्वरूपाचा आहे. मी कधी प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या नाहीत. मी आता देत असलेली (म्हणजे शनिवारी लोकमतला दिलेली) ही माङया कारकिर्दीतील दुसरी मुलाखत आहे, राज्यपाल पुढे सांगू लागले.
वांच्छू यांनी राज्यपालपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे. सोमवारी ते गोव्याचा निरोप घेत आहेत. राजभवनवर जिथे नूतनीकरणाचे व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले आहे, त्या जागेवर उभे राहून व फिरून राज्यपालांनी ‘लोकमत’ला बरीच माहिती दिली. स्वत: उभे राहून छायाचित्रेही काढू दिली. मी मूळचा काश्मिरी सारस्वत आहे. स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कुटुंबाप्रमाणोच. मात्र, आम्ही काश्मीर चारशे वर्षापूर्वी सोडले. गोव्यात मी राज्यपाल म्हणून साधेपणानेच राहिलो. त्यामागे माझा कोणता वेगळा हेतू नव्हता. माझा तो नैसर्गिक स्वभाव आहे. आजच्या काळात ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सर्वानीच जुनी सरंजामशाही सोडून द्यायला हवी. मी राज्यपाल म्हणून अतिशय स्वतंत्र विचाराने काम केले. घटनेनुसार राज्यपालांना जे अधिकार आहेत, तेवढय़ाच अधिकार क्षेत्रत राहून मी काम केले. अतिउत्साहीपणावर माझा विश्वास नाही, वांच्छू म्हणाल़े
ऐतिहासिक चॅपेल सुधारली
राजभवनची इमारत उभी राहण्यापूर्वी सर्वात पहिली काबो-दोनापावल येथे चॅपेल बांधली गेली. या चॅपेलला 46क् वर्षाचा इतिहास असल्याचे सांगूल राज्यपाल म्हणाले दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी येथे प्रार्थना करण्यासाठी ािस्ती बांधव येतात. मी आलो त्या वेळी येथे केवळ चारशे लोक येत होते. मी अधिकाधिक लोक प्रार्थनेसाठी यावेत म्हणून राजभवन खुले केले.त्यानंतर संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
वादांपासून दूर राहिलो
आपण वादांपासून नेहमीच दूर राहिलो. मुख्यमंत्री र्पीकर यांच्याशी माङो नेहमी चांगले संबंध राहिले. मी त्यांना मान दिला व त्यांनीही माझा आदर राखला.