PUBG खेळताना विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद, 'अशी' झाली अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 12:26 PM2023-01-15T12:26:25+5:302023-01-15T12:27:25+5:30

पबजी खेळताना 11 वीतील विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक झाले आहे.

Rajan Raj, a class 11 boy from Bihar has had his Facebook ID hacked in the name of playing PUBG   | PUBG खेळताना विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद, 'अशी' झाली अवस्था

PUBG खेळताना विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद, 'अशी' झाली अवस्था

googlenewsNext

नवी दिल्ली : PUBG खेळण्याच्या नादात राजन राज नावाच्या बिहारमधील 11 वीतील मुलाचे फेसबुक आयडी हॅक झाले आहे. आयडी हॅकर स्वत:ला उत्तर प्रदेशातील यूट्यूबर असल्याचे म्हणत आहे. फेसबुकची आयडी रिकव्हर करण्यासाठी हॅकरने विद्यार्थ्याकडून आतापर्यंत 600हून अधिक रूपये उकळले आहेत. परंतु हॅकरने विद्यार्थ्याला आयडी परत केला नाही. 

तुझ्या आयडीवरून सगळ्यांना चुकीचे मेसेज पाठवेन असे म्हणत हॅकर विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत आहे. यामुळे विद्यार्थी निराश झाला असून अस्वस्थ आहे. मागील चार दिवसांपासून त्याने खाणेपिणे बंद केले आहे. त्यामुळे घरातील सदस्यही नाराज आहेत. आयडीसाठी विद्यार्थ्याने त्याच्या आईसह शनिवारी शहर पोलीस स्थानकात धाव घेतली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला समजावून सांगितले की, तू फेसबुक आयडी हॅक झाल्याची माहिती तुझ्या सोशल मीडियावरील इतर अकाउंटवरून मित्रांना दे. तसेच स्टेट सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवा. तुम्ही तक्रारीची प्रत घेऊन फेसबुकला तक्रार केल्यास आयडी परत केली जाईल.

आतापर्यंत 600 रूपये उकळले
विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांकडे व्यथा मांडताना म्हटले, त्यांचा मुलगा अवघ्या 17 वर्षांचा आहे, त्याला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचे व्यसन लागले आहे. मात्र, याच दरम्यान त्याचा फेसबुक आयडी कोणीतरी हॅक केला आहे. आतापर्यंत 600 रूपये देखील उकळले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या आईला समजावून सांगितले की, पबजी गेम खेळल्याने मुलामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होते. मग पोलिसांसमोर विद्यार्थ्याच्या आईने मोबाईलमधून पबजी गेम डिलीट केला.

असा केला फेसबुक आयडी हॅक  
पबजी खेळत असताना फेसबुकवर लॉग इन करावे लागते. त्यानंतर इतर राज्यातील किंवा देशांतील गेमर्ससह एकत्र खेळू शकतात. अनेक गेमर एक टीम तयार करून एकत्र खेळतात. विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की हा आयडी हॅकर जो स्वतःला यूट्यूबर म्हणत होता. त्याने सांगितलेल्या 3 स्टेप्समुळे विद्यार्थी अडचणीत आला आहे. त्याने क्वाइन देण्याचे नाटक केले अन् त्याला लिंक पाठवली. लॉग ऑन केल्यानंतर त्याचा युजर आयडी दिसला आणि त्याचा फेसबुक आयडी हॅक झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Rajan Raj, a class 11 boy from Bihar has had his Facebook ID hacked in the name of playing PUBG  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.