राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते - सुब्रमण्यम स्वामी
By admin | Published: June 19, 2016 01:24 PM2016-06-19T13:24:27+5:302016-06-19T13:30:59+5:30
भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून रघुराम राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत आहेत असा आरोप राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून रघुराम राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते असा गंभीर स्वरुपाचा आरोप राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. राजन यांच्यावर आरोप करण्याची स्वामींची ही पहिली वेळ नाही.
यापूर्वीही स्वामींनी राजन यांना आरबीआय गव्हर्नरपदावरुन हटवण्याची मागणी केली होती. राजन यांच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. राजन छोटे आणि मध्यम उद्योग बंद करण्याच्या मागे लागले होते असा आरोप स्वामींनी केला आहे.
रघुराम राजन यांनी गर्व्हनरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सोशल मिडीयामधून मोदी सरकारवर जोरदार टीका सुरु आहे.
अनेकांनी राजन यांना आरबीआय गर्व्हनरपदी कायम ठेवावे, त्यांची देशाला गरज आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. रघुराम राजन यांचा कार्यकाळ चार सप्टेंबरला संपणार आहे त्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणार आहेत.