Drugs Smuggling: बोंबला! महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले 6 कोटींचे ड्रग्स, अधिकारी झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 05:11 PM2022-03-04T17:11:46+5:302022-03-04T17:11:55+5:30

Drugs Smuggling: UAE वरुन आलेली महिला राजस्थानच्या जयपूर विमानतळावर उतरली. यावेळी स्कॅनिंग मशीनमध्ये अधिकाऱ्यांना तिच्या पोटात ड्रग्सच्या कॅप्सूल असल्याचे आढळून आले.

Rajasthan | Drugs News | Woman hides 88 drugs capsules in private part, Jaipur officials arrested her | Drugs Smuggling: बोंबला! महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले 6 कोटींचे ड्रग्स, अधिकारी झाले थक्क

Drugs Smuggling: बोंबला! महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले 6 कोटींचे ड्रग्स, अधिकारी झाले थक्क

Next

जयपूर: तुम्ही आतापर्यंत तस्करीची अनेक प्रकरणे ऐकली किंवा वाचली असतील. पण, राजस्थानमधूनतस्करीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. राजधानी जयपूरमध्ये एका महिलेला तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून सहा कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष?

6 कोटींचे ड्रग्स लपवले
आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेने ड्रग्सच्या कॅप्सूल आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणल्या होत्या. जप्त केलेल्या 862 ग्रॅम हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 6 कोटी रुपये आहे. हेरॉईन कॅप्सूल काढण्यासाठी डॉक्टरांना 12 दिवस लागले. ही महिला युगांडाची रहिवासी असून, सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत.

तपासात आढळले कॅप्सूल
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने काही कॅप्सूल तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवल्या होत्या, तर तिने काही कॅप्सूल गिळल्या होत्या. मूळची सुदानची असलेली ही महिला 19 फेब्रुवारीला शारजाह, UAE येथून जयपूर विमानतळावर पोहोचली. येथे स्कॅनिंग करताना गुप्तचर संचालनालयाला(DRI) महिलेच्या शरीरात कॅप्सूल आढळून आल्या.

14 दिवसांची कोठडी
यानंतर दंडाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर महिलेला जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी 19 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत महिलेच्या शरीरातील कॅप्सूल काढल्या. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. येथे न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

आसाममध्ये सोन्याची तस्करी पकडली गेली
असाच एक प्रकार आसाममध्येही समोर आला होता. बोकाजन येथे 7 जानेवारी रोजी एका महिलेला तिच्या साथीदारासह सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आली होती. ही महिला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवलेले अर्धा किलो सोने घेऊन जात होती. दोघे कोहिमाहून गुवाहाटीला जाणाऱ्या बसमध्ये होते. हे सोने मणिपूरमधील इंफाळ येथून गुवाहाटी येथे विकण्यासाठी नेले जात होते. महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 3 सोन्याची बिस्किटे लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले.

Web Title: Rajasthan | Drugs News | Woman hides 88 drugs capsules in private part, Jaipur officials arrested her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.