गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने नव्हे 'ब्रह्मगुप्त'ने मांडला- भाजपा मंत्र्याचा अजबगजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 12:24 PM2018-01-09T12:24:12+5:302018-01-09T12:25:44+5:30

राजस्थानमध्ये इतिहास विषयावरील वादविवादाच्या मध्येच आता विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याची तयारी सुरू आहे.

rajasthan education minister vasudev devnani says brahmagupta came with gravitation law not newton | गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने नव्हे 'ब्रह्मगुप्त'ने मांडला- भाजपा मंत्र्याचा अजबगजब दावा

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने नव्हे 'ब्रह्मगुप्त'ने मांडला- भाजपा मंत्र्याचा अजबगजब दावा

Next

जयपूर - राजस्थानमध्ये इतिहास विषयावरील वादविवादाच्या मध्येच आता विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याची तयारी सुरू आहे. भाजपा नेते व राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी इतिहास विषयानंतर आता विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमातील तथ्य बदलण्यास सांगितले आहे. ''गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडल्याचे शाळेत शिकवले जाते. मात्र, हा सिद्धान्त ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडला होता'', असा अजबगजब दावा राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी केला आहे. 

राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसनिमित्त एका कार्यक्रमामध्ये राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात देवनानी असे म्हणाले की, 'आजपर्यंत गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडला असे तुम्ही शिकला आहात, मी पण हेच शिकलो. पण न्यूटनहून हजारो वर्षांपूर्वी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, असा दावा त्यांनी यावेळी केला. आपण आधुनिक विज्ञानाचे धडेही दिलेत पाहिजे. उत्तम दर्जाच्या शालेय शिक्षणातूनच उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. ही माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाद्वारे का शिकवली जाऊ नये, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला

राजस्थानमध्येही दुसरा कन्हैया घडू नये, याकडे विद्यापीठांनी लक्ष दिले पाहिजे. उच्च शिक्षणातून फक्त चांगले पॅकेज घेणारे विद्यार्थी घडत आहे. पण संस्काराचे मूल्य कमी होत आहे, असे देवनानी यांनी सांगितले. विद्यापीठांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे, यामुळे देशातील अनेक समस्यावर तोडगा निघू शकेल, असे त्यांनी म्हटले. भाजपाच्या काळात पाठ्यपुस्तकांमध्ये झालेल्या बदलांकडेही देवनानी यांनी यावेळी लक्ष वेधले.  
 

Web Title: rajasthan education minister vasudev devnani says brahmagupta came with gravitation law not newton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.