Rajasthan Elections 2018 : 'हा तर महिलांचा अपमान'; शरद यादवांच्या वादग्रस्त विधानावर वसुंधरा राजेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 10:26 AM2018-12-07T10:26:04+5:302018-12-07T10:42:10+5:30
माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे. ''वसुंधराला आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत'', असे वादग्रस्त विधान शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केले होते.
जयपूर - माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पलटवार केला आहे. ''वसुंधरा राजेंना आराम द्या, त्या थकल्या आहेत, खूप जाड झाल्या आहेत'', असे वादग्रस्त विधान शरद यादव यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान केले होते. यादव यांच्या या विधानावर वसुंधरा राजेंनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
वसुंधरा राजेंचा पलटवार
'शरद यादव यांच्या विधानामुळे मी स्तब्ध झाले आहे. एवढा मोठा नेता आपल्या जीभेवर संयम ठेऊ शकत नाही, तर त्याचे वाईट वाटते. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी. त्यांच्या विधानामुळे माझा अपमान झाला आहे. खरंतर हा महिलावर्गाचा अपमान आहे'.
राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान, झालरापाटन येथे वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजेंनी शरद यादव यांच्या टीकेला उत्तर दिले.
#Rajasthan CM Vasundhara Raje on Sharad Yadav's remark 'Vasundhara (Raje) ko aaram do, thak gayi hain, bahut moti ho gayi hain': To set an example for future it's important that EC takes cognisance of this kind of language. I actually feel insulted&I think even women are insulted pic.twitter.com/dNCO0QLTDX
— ANI (@ANI) December 7, 2018
शरद यादव यांचे वादग्रस्त विधान
शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर वादग्रस्त विधान केले. 'राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत आणि त्यांना आता आराम द्यायला हवा', असे विधान राजस्थानच्या अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते. दरम्यान, वसुंधरा राजे मध्य प्रदेशची कन्या असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते. शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
#WATCH Sharad Yadav on Vasundhra Raje in Alwar, Rajasthan: Vasundhra ko aaram do, bahut thak gayi hain, bahut moti ho gayi hain, pehle patli thi. Humare Madhya Pradesh ki beti hai. pic.twitter.com/8R5lEpuSg0
— ANI (@ANI) December 6, 2018