फेसबुकवर मैत्री करून फसवलं, पाच जणांनी मिळून केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 06:03 PM2018-01-31T18:03:39+5:302018-01-31T18:14:27+5:30
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या माध्यमातून 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीची एका मुलाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे दररोज बोलणं होतं असे.
नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या माध्यमातून 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीची एका मुलाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे दररोज बोलणं होतं असे. त्या मुलीला भेटण्याच्या निमित्तानं बोलावून आपल्या पाच मित्रांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमधून पीडित मुलगी आणखी सावरलेली नाही.
ही धक्कादायक घटना राजस्थानमधील झुंझुनूं जिल्ह्यातील खेतडी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलानं फेसबुकद्वारे त्या मुलीशी ओळख वाढवली. प्रेमात आंधळ्या झालेल्या त्या मुलीनं त्याच्यावर विश्वास ठेवत भेटायला गेली. त्याचा डाव तिच्या लक्षात आला नाही. त्यानं सांगितलेल्या ठिकाणी ती पोहोचली असता, आरोपीचे आणखी चार सहकारी (वर्गमित्र) तेथे आधीच होते. त्यानंतर त्या पाच जण त्या मुलीला निर्जळस्थळी घेऊन गेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपी एवढ्यावर थांबले नाहीत. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर त्यांनी तिला एका विहिरीमध्ये टाकले. तब्बल 40 तास ती विव्हळत आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये विहिरीमध्ये पडून होती.
40 तासांनंतर शुद्धीवर येताच तिने जोरजोरानं ओरडायला सुरुवात केली. विहिरीजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीला मदतीचा आवाज आला. आवाज येताच त्या व्यक्तीनं विहिरीकडे धाव घेतली. शेजारील लोकांच्या मदतीनं पीडितेला बाहेर काढलं. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलीस स्टेशनमध्ये झालेली घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत पुढील कारवाई करत आहेत. पीडित मुलीच्या पायला गंभीर जखम झाली असून, तिच्या डोक्यालाही मार लागला आहे. सध्या तिला जयपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या मांमी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण पाच जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मधील दोन विद्यार्थी अज्ञात आहेत. तर दोनजवळील होस्टेलमध्ये राहत आहेत. एकत्र शाळेत शिकत असल्यामुळं फेसबुकवरही त्यांच्यामध्ये मैत्री झाली. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच शाळेत शिकतात.