लय भारी! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; असिस्टंट कमांडंट होऊन कौतुकास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:32 PM2023-08-08T12:32:21+5:302023-08-08T12:40:39+5:30

राजस्थानमधील एका शेतकऱ्याचा मुलगा सुनील कुमार मीणा यूपीएससी सीएपीएफ असिस्टंट कमांडंट पदासाठी पात्र ठरला आहे.

rajasthan farmer son clear upsc capf ac exam become assistant commandant | लय भारी! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; असिस्टंट कमांडंट होऊन कौतुकास्पद कामगिरी

लय भारी! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; असिस्टंट कमांडंट होऊन कौतुकास्पद कामगिरी

googlenewsNext

राजस्थानमधील एका शेतकऱ्याचा मुलगा सुनील कुमार मीणा यूपीएससी सीएपीएफ असिस्टंट कमांडंट पदासाठी पात्र ठरला आहे. या परीक्षेत 187 वी रँक मिळवून सुनीलने धौलपूर जिल्ह्यातील सरमथुरा उपविभागातील रहरई या आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा गौरव केला आहे. बारावी पास वडील भौर्य मीणा आणि कमी शिकलेली आई हरप्यारी यांच्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. सुनीलने या यशासाठी खूप मेहनत आणि संघर्ष केला आहे.

सुनील कुमार मीणा याचे वडील भौर्या मीणा यांना चार मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांनी शेतात कष्ट केले आणि आपल्या 6 मुलांना शिक्षण देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शेतकरी भौर्या मीणा यांचा मोठा मुलगा रामवीर मीणा हा रेल्वेत वाहतूक निरीक्षक आहे, दुसरा मुलगा राजवीर हा रेल्वेत लोको पायलट आहे आणि तिसरा मुलगा सत्यप्रकाश आणि दोन्ही मुली रेवती आणि रेशम स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. आता धाकटा मुलगा सुनील कुमार याची असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झाली आहे. या यशाचे श्रेय तो त्याचे आई-वडील आणि भावंडांना देतो, ज्यांनी त्याला नेहमीच प्रेरणा दिली.

सुनील कुमारने यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात 187 वा क्रमांक पटकावला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आई-वडिलांनी प्रयत्न केला आहे. सुनीलने पाचवीच्या परीक्षेतून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला होता, तेथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला. सुनीलने दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून बीए आणि दिल्ली विद्यापीठाच्या भूगोल विभागातून एमए केले. 

कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. यानंतर सुनील 2022 मध्ये यूपीएससीने घेतलेल्या असिस्टंट कमांडंटच्या परीक्षेला बसला. सहायक कमांडंट पदावर निवड झाल्यानंतर सुनीलच्या गावाला आनंद झाला. सुनील कुमारने सांगितले की, त्याने दिल्लीत महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान यूपीएससीची तयारी सुरू केली होती.  परीक्षेसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. सध्या सुनील कुमार जयपूरमध्ये राहून आयएएसची तयारी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: rajasthan farmer son clear upsc capf ac exam become assistant commandant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.