राजस्थानमध्ये लढाऊ विमान कोसळले, तीन जण जखमी
By admin | Published: March 15, 2017 05:25 PM2017-03-15T17:25:46+5:302017-03-15T17:31:36+5:30
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे सुखोई विमान बुधवारी कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक सुखरुप बचावले. मात्र ज्याठिकाणी कोसळले, तेथील तीन नागरिक जखमी झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 15 - राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे सुखोई विमान बुधवारी कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक सुखरुप बचावले. मात्र ज्याठिकाणी कोसळले, तेथील तीन नागरिक जखमी झाले आहेत.
नेहमीच्या सरावादरम्यान बारमेरजवळ सुखोई -30 MKI लढाऊ विमान दुपारच्या सुमारास कोसळले. यामध्ये असणारे दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा यांनी दिली.
दरम्यान, विमान कोसळल्याची माहिती पावणे तीनच्या सुमारास येथील स्थानिक पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच, भारतीय हवाई दलाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. या घटनेत गावातील काही घरांचे नुकसान झाले असून तीन नागरीक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#Correction Rajasthan: Sukhoi-30MKI crashes in Shivkar Kudla village in Barmer. Both pilots ejected safely pic.twitter.com/yIKJtrXsgR
— ANI (@ANI_news) March 15, 2017