परदेशात नाही भारतात! लग्न केल्यानंतर हे राज्य देतेय १० लाख रुपये; केंद्रासोबत मिळून सरकारी योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:07 PM2023-03-28T12:07:36+5:302023-03-28T12:08:00+5:30
देश, विदेशातील सरकारे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. इटलीने देखील काही महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.
गेल्या काही दिवसांपासून आपण राजस्थानातील मुलीच्या लग्नात मामाने करोडो रुपये, दागिने, जमिन आदी घेऊन आल्याचे ऐकत आहोत. राजस्थान सध्या मोठमोठ्या सेलिब्रेटींसाठी वेडिंग डेस्टिनेशनही आहे. असे असताना राजस्थान सरकारने लग्न करणाऱ्यांसाठी जबरदस्त योजना आणली आहे.
देश, विदेशातील सरकारे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात. हाँगकाँग सरकारने पर्यटन वाढविण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची योजना आणली होती. एवढेच नाही तर विमानाचे तिकीटही मोफत दिले जात होते. इटलीने देखील काही महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. अशाच प्रकारची घोषणा राजस्थान सरकारने केली आहे.
राजस्थान सरकारने आंतरजातीय विवाह केल्यास वधु-वराला एकत्रित १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आधी ही रक्कम ५ लाख रुपये होती. ती आता १० लाख रुपये करण्यात आली आहे. सामाजिक समानता आणि एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारदेखील अशी योजना चालविते.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 5 रुपयांऐवजी 10 लाख रुपये दिले जातील. राजस्थान सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. समाजात एकजूट राहावी यासाठी हे करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
डॉ. सविता बेन आंबेडकर आंतरजातीय सुधारित विवाह योजनेनुसार यातील ५ लाख रुपये हे 8 वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये ठेवले जाणार आहेत. तसेच उरलेले ५ लाख रुपये हे जोडप्याच्या संयुक्त बँक खात्यात वळते केले जाणार आहेत. 2006 मध्येया योजनेला सुरुवात झाली होती. त्यात ५० हजार रुपये देण्यात येत होते. 2013 मध्ये 5 लाख रुपये करण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही रक्कम देतात. यात राज्याचा वाटा ७५ टक्के आणि केंद्राचा २५ टक्के आहे.