भाजपाचा चेहरा कोण?; PM मोदींनी केली राजस्थानमध्ये घोषणा, जिंकून देण्याचंही केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:14 PM2023-10-02T16:14:28+5:302023-10-02T16:24:22+5:30

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जाहीर सभा घेतली.

Rajasthan has only one face and that is the lotus. Narendra Modi appealed that Kamal wants to win | भाजपाचा चेहरा कोण?; PM मोदींनी केली राजस्थानमध्ये घोषणा, जिंकून देण्याचंही केलं आवाहन

भाजपाचा चेहरा कोण?; PM मोदींनी केली राजस्थानमध्ये घोषणा, जिंकून देण्याचंही केलं आवाहन

googlenewsNext

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसची सत्तेबाहेर पडण्याची उलटी गिनती सुरु झाली असल्याचं विधान नरेंद्र मोदी यांनी केले. याबाबत दिल्लीत बसणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना कधाचित माहिती नसेल, परंतु अशोक गहलोत यांना कल्पना आली असल्याचा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी केला. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस एकतर मला शिव्या देते, नाहीतर केंद्र सरकारच्या योजना राज्यात येण्यापासून रोखते. आम्ही स्वच्छता अभियान सुरू केले. मात्र स्वच्छता ही महात्मा गांधीजींची कल्पना होती. भाजपाचा याच्याशी काहीही संबंध नाही. पण, या अहंकारी आघाडीचे नेते हे काम करणार नाहीत, कारण त्यातून त्यांना काहीच मिळत नाही, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. भाजपा अशा वर्गांसाठी काम करत आहे ज्यांचा कोणी विचारही केला नाही. भाजपा सरकारने कुंभार, लोहार, धोबी, सुतार, चर्मकार आणि इतरांसाठी विश्वकर्मा योजना आणली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये राहणाऱ्या या समाजातील लोकांचाही विकास होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

राजस्थानमध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे कमळ. कमळला जिंकवायचे आहे आणि भाजपा सरकार बनवायचे आहे, असं आवाहन नरेंद्र मोदींनी उपस्थितांना केले. आज मी राजस्थानच्या प्रत्येक गरीबाला कायमस्वरूपी घर मिळेल याची हमी देतो. आतापर्यंत चार कोटी घरे बांधली गेली आहेत आणि जी बांधली गेली नाहीत त्यावर काम सुरू आहे. लवकरच त्यांनाही कायमस्वरूपी घरे मिळणार आहे. ज्यांचे घर अद्याप बांधले नाही, त्यांना सांगा की मोदींनी कायमस्वरूपी घर बांधण्याची हमी दिली आहे. यासोबतच प्रत्येक घरात नळाला पाणी देण्याचं आश्वासन देखील पंतप्रधान मोदींनी दिली. ते म्हणाले की, राज्यातील ४५ लाख घरांमध्ये पाणी पोहोचले आहे. राज्यात भाजपाचे सरकार येताच कामाला वेग येईल आणि घराघरात पाणी पोहोचेल, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थान मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे-

भाजपा येईल, गुंडगिरी जाईल
भाजपा येणार, दंगली थांबवणार
भाजपा येईल आणि दगडफेक थांबवेल
भाजपा येईल, बेईमानी थांबेल
भाजपा येणार, महिला सुरक्षा आणणार
भाजपा येणार, रोजगार आणणार
भाजपा येईल, राजस्थान समृद्ध करेल

Web Title: Rajasthan has only one face and that is the lotus. Narendra Modi appealed that Kamal wants to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.