धक्कादायक! : राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांचा प्रताप, कोरोना संक्रमित असतानाही केला रुग्णालयाचा दौरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 09:42 PM2020-11-25T21:42:01+5:302020-11-25T21:45:25+5:30
राजस्थानातील आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजल्यानंतर रघू शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, येथे त्यांनी जो प्रताप केला, त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा कहर सातत्याने वाढताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, एकीकडे सर्वच राज्यांतील सरकारे आपल्या नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करायला सांगत आहे. तर दुसरीकडे राजस्थानात, आरोग्यमंत्र्यांनी स्वत:च, कोरोना संक्रमित असताना रुग्णालयाचा दौरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजस्थानातील आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजल्यानंतर रघू शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, येथे त्यांनी जो प्रताप केला, त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
रघू शर्मा हे कोरोना संक्रमित असतानाही आणि रुग्णालयात उपचार घेत असतानाही, या रुग्णालयातील इतर आजारी असलेल्या रुग्णांची चौकशी करत फिरले. यावेळी त्यांना आपण स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह आहोत याचे भाण राहिले नाही.
आज आरयूएचएस डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल में बने नवीन आईसीयू व अस्पताल के अन्य क्षेत्र का दौरा कर इंतज़ामात का जायज़ा लिया। साथ ही भर्ती मरीजों से भी मुलाकात कर उनकी कुशलक्षेम पूछी। pic.twitter.com/yO6ydidtzJ
— Dr. Raghu Sharma (@RaghusharmaINC) November 24, 2020
यादरम्यान रघू शर्मा यांनी वेगवेगळ्या वार्डमध्ये जाऊन लोकांच्या प्रकृतीची चौकशी केली. एवढेच नाही, तर त्यांनी याचे फोटोही आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकले आहेत. यासोबतच त्यांनी लिहिले आहे, आरयूएचएस डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेल्या नव्या आयसीयू आणि रुग्णालयाच्या इतर भागांत जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याच बरोबरच येथे दाखल असलेल्या रुग्णाना भेटून त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी केली.