राजस्थानच्या गृहमंत्र्यांना हाकला
By admin | Published: March 31, 2017 01:07 AM2017-03-31T01:07:27+5:302017-03-31T01:07:27+5:30
सामूहिक बलात्कार झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणारे राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया
नवी दिल्ली : सामूहिक बलात्कार झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणारे राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना पदावरून दूर करण्याची मागणी जनता दलने (संयुक्त) राज्यसभेत केली. त्यावर सदस्यांची ही भावना राज्य सरकारकडे योग्य त्या उपाययोजनेसाठी पोहोचवली जाईल, असे आश्वासन संसदीय कामकाजमंत्र्यांनी दिले.
य्जनता दलच्या (संयुक्त) नेत्या कहकाशान परवीन यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. अल्पवेळ कामकाज तहकूब झाल्यावर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला व बेजबाबदार विधाने करणाऱ्या कटारिया यांना पदावरून दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी केली. पंतप्रधान महिलांचा खूप सन्मान करतात. ते जर तसे करत असतील तर राजस्थानचे मंत्री ताबडतोब हाकलून लावले गेले पाहिजेत’’, असे परवीन म्हणाल्या.
काय होते विधान?
गृहमंत्री कटारिया यांनी असे म्हटले होते की आठ जणांकडून बलात्कार झालेल्या मुलीकडून काहीही तक्रार न होणे शक्य आहे का? त्यांच्या या वक्तव्यातून तिच्यावर बलात्कार न झाल्याचे सूचित होत आहे.
परवीन यांी उपस्थित केलेल्या मुद्द्याला काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यात विप्लव ठाकूर यांचा समावेश होता. त्यांनी कटारिया यांनी केलेले विधान प्रसिद्ध झालेले वृत्तपत्र दाखवले.