१.५१ कोटी रोख, ३० तोळे सोने, ५ किलो चांदी अन्... लग्नातल्या भेटवस्तू पाहून पाहुणे थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:23 IST2025-02-10T18:19:26+5:302025-02-10T18:23:16+5:30

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एक लग्न चर्चेत आलं आहे कारण यामध्ये मामांनी भाचीला तब्बल ३ कोटींच्या भेटवस्तू दिल्या आहेत.

Rajasthan Mayra Uncles gave gifts worth 3 crores on niece wedding | १.५१ कोटी रोख, ३० तोळे सोने, ५ किलो चांदी अन्... लग्नातल्या भेटवस्तू पाहून पाहुणे थक्क!

१.५१ कोटी रोख, ३० तोळे सोने, ५ किलो चांदी अन्... लग्नातल्या भेटवस्तू पाहून पाहुणे थक्क!

Rajasthan Mayra: राजस्थानमधील नागौर जिल्हा लग्नातील एका प्रथेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागौरमध्ये बहिणीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी मायरा भरण्याची एक परंपरा आहे. ज्यामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या कुटुंबाला मामाचे कुटुंब लग्नात आर्थिक मदत करतात. पण, यावेळी तीन भावांनी मिळून ३ कोटी रुपये दिले आहेत, जे लग्नाच्या संपूर्ण खर्चापेक्षा कितीतरी जास्त आहे. नागौरमध्ये तीन भावांनी त्याच्या पुतण्या आणि भाचीच्या लग्नात १ कोटी ५१ लाख रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन प्लॉट अशा सुमारे ३ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहे. त्यामुळे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

नागौर शहरातील हनुमान बाग येथील रहिवासी रामबक्स खोजा यांनी आपल्या पुतण्या आणि भाचीच्या लग्नात मायरा प्रथा पार पाडली. हे लग्न अतिशय भव्यदिव्य होते. या लग्नाला अनेक राजकीय पक्षांच्या पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. लग्नादरम्यान तीन मामांनी एकुलत्या एक भाचीला १ कोटी ५१ लाख रुपये रोख दिले. एका सुटकेसमध्ये हे पैसे आणले होते. त्यानंतर सर्व रोख पैसे काढून सर्व पाहुण्यांसमोर मोजली गेली. एवढेच नाही तर मामाने ३० तोळे सोने आणि ५ किलो चांदीचे दागिने भाचीला भेट म्हणून दिले आहेत.

रामबक्स खोजा यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. दोन मुलं सरकारी शिक्षक असून एक खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या मुलीचा विवाह जयल असेंब्लीच्या फरदौद येथील मदनलाल यांच्याशी झाला आहे. रामबक्स खोजा शेतीचे काम करतात. दोन हजार लोकांसह रामबक्स हे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि पाहुण्यांसह त्यांच्या बहिणीच्या घरी पोहोचले. तिन्ही भावांनी मिळून बहीण बिराजयाला चुनरीने सजवून मायराची सुरुवात केली. एक कोटी ५१ लाख रुपये रोख, ३० तोळे सोने, पाच किलो चांदी आणि नागौर शहरातील दोन प्लॉट बहिणीच्या नावावर केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये रोख रक्कम भरून तीन लोक मंडपात येत आहेत. लोक उत्सुक नजरेने नोटांच्या बंडलांकडे बघत आहेत. मंडपातील सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सुटकेसमधून सर्व रोख रक्कम काढून मंडपात आणली जाते. एवढेच नाही तर मामाने दिलेल्या रकमेचीही मोजणी जागेवरच करण्यात आली. 

दरम्यान गेल्या वर्षीही तीन शेतकरी भावांनी त्यांच्या एकुलत्या एक भाचीच्या लग्नावर ३ कोटी २१ लाख रुपये खर्च केले. तिन्ही मामा ताटात रोकड घेऊन आले आणि त्यांनी भाचीला लाखो रुपयांच्या भेटवस्तूही दिल्या ज्यात दागिने, कपडे, धान्य, ट्रॅक्टर-ट्रॉली, स्कूटर आणि इतर वस्तूंचा समावेश होता. लग्नात मुलीचे आजोबा ताटात सुमारे ८१ लाख रुपये घेऊन आले. यावेळी त्यांनी ताट डोक्यावर धरले होते. ताटात ५०० रुपयांचे अनेक बंडल ठेवले होते. याशिवाय १६ एकर जमीन, ३० लाख रुपये किमतीचा भूखंड, ४१ तोळे सोने आणि ३ किलो चांदीचे दागिने देण्यात आले होते.
 

Web Title: Rajasthan Mayra Uncles gave gifts worth 3 crores on niece wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.