राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 03:32 PM2019-03-08T15:32:44+5:302019-03-08T16:02:26+5:30

राजस्थानमधील बिकानेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत विमानाचा पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Rajasthan: MiG-21 aircraft on a routine mission crashed today after getting airborne from Nal near Bikaner | राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित

बिकानेर : राजस्थानमधील बिकानेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत विमानाचा पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिकानेरजवळ भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले. यावेळी विमानातून पायलट सुरक्षितरित्या बाहेर पडला. दरम्यान, घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे अधिकारी दाखल झाले असून विमान कोणत्या कारण्यामुळे कोसळले याची चौकशी करण्यात येत आहे. 


गेल्या काही दिवासांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे भारतीय हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरचा अपघात  झाला होता. या अपघातात दोन पायलट शहीद झाले होते. यावेळी हॅलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले होते. 



 

Web Title: Rajasthan: MiG-21 aircraft on a routine mission crashed today after getting airborne from Nal near Bikaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.