राजस्थानात पुन्हा राडा! आता नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांत दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:36 PM2022-05-03T19:36:01+5:302022-05-03T19:39:53+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांमध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
राजस्थानातील जोधपूर येथील हिंसाचारानंतर, आता नागौर येथूनही हिंसाचाराचे वृत्त येत आहे. नागौर येथे ईद साजरी करण्यावरून एकाच समाजाच्या दोन गटांत वाद निर्माण झाला. नंतर हा वाद एवढा वाढला, की हे दोन गट एकमेकांसोबतच भिडले. यावेळी दोन्ही गटांत तुफान दगडफेक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांमध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीनंतर वाद आणखी वाढला. यानंतर या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागौर शहरातील किदवई कॉलनी घडली. घटनेची माहिती मिळताच नागौर शहरातील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजवून शांत केले.
जोधपूर येथेही ईदच्या दिवशीच हिंसाचार -
तत्पूर्वी, जोधपूर येथेही ईदच्या दिवशीच लाउडस्पीकर आणि झेंड्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार झाला. यात अनेक लोक जखमी झाले. येथील वाद एवढा वाढला होता, की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. एवढेच नाही, तर येथे आश्रूधुराचे गोळेही सोडण्यात आले. याशिवाय, मंगळवारी अनंतनाग येथेही मशिदीबाहेर दगडफेक झाली. ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला गेला. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.