Video - "एक दिन मर जाऊं..."; भजनावर नाचताना शिक्षकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 02:16 PM2024-08-04T14:16:49+5:302024-08-04T14:17:39+5:30
एका कार्यक्रमात नाचत असताना ४५ वर्षीय शिक्षकाचा अचानक मृत्यू झाला. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या मोठ्या भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जयपूरमध्ये एका कार्यक्रमात नाचत असताना ४५ वर्षीय शिक्षकाचा अचानक मृत्यू झाला. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या मोठ्या भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिक्षक आनंदाने नाचत होते. नाचत असताना अचानक ते जमिनीवर पडले आणि पुन्हा उठलेच नाहीत.
शिक्षक खाली पडलेले पाहुन लोकांनी लगेचच सुरू असलेला कार्यक्रमा थांबवला. जवळपास दहा मिनिटं त्यांना सीपीआर देण्यात आला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जयपूरमधील रेनवालच्या भैंसलाना गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
भैंसलाना येथील जालबली बालाजी मंदिरात शुक्रवारी रात्री मोठ्या भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भजनाचा कार्यक्रम होता. यानिमित्ताने शिक्षक मन्नाराम जाखड हे देखील सकाळी त्यांच्या मूळ गावी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. शिक्षक मन्नाराम भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले आणि पहिल्या चार-पाच भजनांवर खूप नाचत होते.
राजस्थान में नाचते हुए शख्स की हार्ट अटैक से मौत pic.twitter.com/TOFCDTpbgf
— Priya singh (@priyarajputlive) August 4, 2024
रात्री बाराच्या सुमारास 'एक दिन मर जाऊं ला कानूड़ा, ध्हारी मुस्कान के मारे...' हे भजन सुरू झालं. या भजनावर शिक्षक नाचू लागले, पण काही क्षणातच ते खाली पडले. मात्र, सुरुवातीला लोकांना नेमकं काय झालंय हेच कळलं नाही. पण नंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मन्नाराम हे जोधपूर जिल्ह्यातील जुड गावातील सरकारी शाळेत शिक्षक होते. घटनेच्या काही मिनिटं आधी त्यांनी पत्नी आणि संपूर्ण कुटुंबासह डान्स केला. शिक्षकाच्या मृत्यूबाबत कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अचानक घडलेल्या या घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नाही. या घटनेचा व्हि़डीओ खूप व्हायरल होत आहे.