2 किलो सोने, 100 किलो चांदी, बंगला, कार अन्...; बापाने राजकन्येसारखी केली लेकीची पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 04:23 PM2023-02-26T16:23:51+5:302023-02-26T16:30:55+5:30

एका व्यावसायिकाने आपल्या मुलीला 2 किलो सोने आणि 100 किलो चांदीचे दागिने आणि वस्तू भेट म्हणून दिल्या.

rajasthan pali businessman gave silver sofa bed and crores of goods at his daughter wedding | 2 किलो सोने, 100 किलो चांदी, बंगला, कार अन्...; बापाने राजकन्येसारखी केली लेकीची पाठवणी

फोटो - आजतक

googlenewsNext

राजस्थानमध्ये सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यावसायिकाने आपल्या मुलीला 2 किलो सोने आणि 100 किलो चांदीचे दागिने आणि वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यात चांदीची भांडी आणि चांदीचा पलंग, सोफा-सेट आणि डायनिंग टेबल यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर उद्योगपती वडिलांनी मुलीला कोट्यवधी रुपयांच्या इतर वस्तू दिल्या आहेत, ज्याचीही जोरदार चर्चा आहे.

महेंद्र सिंह सेवाड (राजपुरोहित) यांनी पालीच्या जैतारण भागातील मोहराई गावात आपली मुलगी वंशिका हिचा विवाह केला होता. नवरदेव कुलदीप सिंह जागरवाल हा देखील एक व्यापारी आहे, जो भैसाना गावचा रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे नाव लक्ष्मण सिंह जागरवाल आहे. मोहराईपासून पाच किमी अंतरावर असलेल्या रिसॉर्टमध्ये पाहुण्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

लग्नात व्यापारी महेंद्र सिंह यांनी आपल्या मुलीला 2 किलो सोन्याचे दागिने, 100 किलो चांदीचे दागिने, फर्निचर आणि भांडी, एसयूव्ही कार आणि बंगला भेट म्हणून दिला आहे. यामध्ये चांदीची भांडी, सिल्व्हर बेड सोफा-सेट आणि डायनिंग टेबल यांचा समावेश आहे.

यासोबतच सुमारे तीन किलो वजनाचे इतर सोन्याचे दागिनेही मुलीला डोक्यापासून पायापर्यंत घालण्यासाठी देण्यात आले. यासोबतच एक SUV-700 कार, स्कूटी, बंगळुरूमध्ये 12 हजार स्क्वेअर फूट फॅक्टरी, 30×40 प्लॉट, पालीच्या हाऊसिंग बोर्डमध्ये जमीन आणि एक कोटी 8 लाखांची एफडी देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: rajasthan pali businessman gave silver sofa bed and crores of goods at his daughter wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न