साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:08 PM2022-03-31T18:08:29+5:302022-03-31T18:12:28+5:30

पोलिसांनी 'सुफा' संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

Rajasthan police arrested Sufa Organization Members, 12 kg RDX siezed | साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त

साखळी बॉम्बस्फोटचा कट उधळला! राजस्थानातून 3 दहशतवादी अटकेत, 12 किलो RDX जप्त

Next

रतलाम:जयपूरला(jaipur) साखळी बॉम्बस्फोटांनी हादरवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. राजस्थान पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मध्य प्रदेशातील सुफा संघटनेच्या तीन कट्टरपंथीयांना चित्तोडगडच्या निंबाहेरा येथून अटक केली आहे. त्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य, टायमर आणि 12 किलो आरडीएक्स(RDX) जप्त करण्यात आले आहे.

'सुफा' संघटनेच्या तिघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निंबाहेरा येथे बॉम्ब बनवून दुसर्‍या टोळीला देणार होते. ही टोळी हेच बॉम्ब जयपूरमध्ये तीन ठिकाणी ठेवून, नंतर ते टायमरच्या सहय्याने उडवणार होते. हा कट अंमलात आणण्याआधीच पोलिसांनी त्या तिघांना पकडले. हे तिघे देशद्रोहाच्या प्रकरणातील कुख्यात सुफा संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना 2012-13 मध्ये मध्य प्रदेशातील रतलाममध्ये सक्रिय झाली होती. गेली अनेक वर्षे शांत राहिल्यानंतर आता ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाली आहे.

सुफा दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलप्रमाणे काम करते
सुफा ही कट्टरपंथी विचारसरणीच्या 40-45 तरुणांची इस्लामिक संघटना आहे. हे दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलसारखे काम करते. ही संघटना कट्टरतावादी विचारसरणीची पुरस्कर्ते आहे. या संघटनेने मुस्लिम समाजातील विवाह आणि इतर कार्यक्रमांना हिंदू प्रथा म्हणून विरोध केला होता.

आता एटीएसकडून चौकशी होणार 
दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी उदयपूर आणि जयपूर एटीएसचे पथक बुधवारी संध्याकाळी उशिरा निंबाहेरा येथे पोहोचले. त्यांची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेशची एटीएसही पोहोचणार आहे. उदयपूरचे आयजी हिंगलाज दान यांनी सांगितले की, जुबेर, अल्तमास आणि सरफुद्दीन उर्फ ​​सैफुल्ला अशी आरोपींची नावे आहेत. ते रतलाम येथून पळून निंबाहेराजवळील राणीखेडा येथे राहत होते. राजस्थानमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांच्या माहितीवरून रतलाम येथूनही दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातही RDXचा वापर करण्यात आला
मुंबई बॉम्बस्फोटातही RDX(रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सप्लोझिव्ह) वापरण्यात आले होते. हा स्फोटक किती धोकादायक आहे, याचा अंदाज पुलवामा बॉम्बस्फोटावरुन लावता येईल. पुलवामा स्फोटात 60 किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. आरडीएक्सचा स्फोट इतका धोकादायक असतो की, त्याच्या आवारात स्टील आले तरी ते वितळेल. या स्फोटकामध्ये सर्वात मजबूत काँक्रीट आणि स्टीलही क्षणार्धात उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

Web Title: Rajasthan police arrested Sufa Organization Members, 12 kg RDX siezed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.