Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 03:35 PM2020-07-13T15:35:14+5:302020-07-13T15:38:41+5:30

Rajasthan Political Crisis: राजस्थानमध्ये भाजपानं मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न केल्यास त्यांच्यासमोर मोठं आव्हान

Rajasthan Political Crisis 19 congress mlas absent in meeting know the number game | Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

Next

जयपूर: राजस्थानातील सत्ता संघर्ष (Rajasthan Political Crisis) कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे बहुसंख्य आमदार उपस्थित राहिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांचं बंड मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण बैठकीला अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे किमान १९ आमदार नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. गेहलोत आमदारांसोबत माध्यमांसमोर आले. त्यांनी व्हिक्टरीचं चिन्ह दाखवत राज्यातील सरकार टिकणार असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं. मात्र गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला पायलट यांच्यासह काँग्रेसचे किमान १९ आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारवरील संकट कायम असल्याचं दिसत आहे.

आपल्याकडे २५ ते ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा पायलट गटाकडून केला जात होता. मात्र आज दुपारी बोलावण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला किमान १९ आमदार अनुपस्थित होते. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यास विधानसभेतील आमदारसंख्या २०० वरून १८१ होईल. अशा परिस्थितीत बहुमतासाठी ९१ आमदारांचा पाठिंबा गरजेचा असेल.

विधानसभेत भाजपाचे ७२ आमदार आहेत. याशिवाय त्यांना आरएलपीच्या ३ आमदारांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे गेहलोत यांच्याकडे काँग्रेसच्या ८८ (बैठकीला अनुपस्थित असलेल्या सर्व १९ आमदारांनी राजीनामे दिल्यास) आमदारांसह लहान पक्षांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते सहज सत्ता टिकवू शकतील. काँग्रेसच्या २५ ते ३० आमदारांनी राजीनामे दिल्यास भाजपाला राजस्थानात मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करता येईल. याशिवाय त्यांना लहान पक्षांसह अपक्षांनादेखील हाताशी घ्यावं लागेल.

"राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"

सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत

Read in English

Web Title: Rajasthan Political Crisis 19 congress mlas absent in meeting know the number game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.