'बाळ गंगाधर टिळक दहशतवादाचे जनक', आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 09:00 AM2018-05-11T09:00:17+5:302018-05-11T09:04:04+5:30

'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक' असल्याचा उल्लेख इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये करण्यात आला आहे.

Rajasthan : reference book for class 8 social studies describes bal gangadhar tilak father of terrorism | 'बाळ गंगाधर टिळक दहशतवादाचे जनक', आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त उल्लेख

'बाळ गंगाधर टिळक दहशतवादाचे जनक', आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त उल्लेख

Next

नवी दिल्ली - 'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक' असल्याचा उल्लेख इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक यांचा अपमान केल्याचा हा संतापजनक प्रकार राजस्थानमधील आहे. या प्रकाराबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. हे पुस्तक मथुरेतील एका प्रकाशकाने छापले आहे.  या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला आहे.

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये टिळकांबाबत  हा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. 'अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ' या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे. 'टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात. ब्रिटीश अधिकाऱ्यांना विनंती करुन स्वातंत्र्य मिळणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्यांचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते, असे पाठ्यपुस्तकात म्हटले गेले आहे.  दरम्यान, राजस्थान सरकार याबाबत संबंधितांवर काय कारवाई करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Rajasthan : reference book for class 8 social studies describes bal gangadhar tilak father of terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.