वडील शिंपी, आईही करायची शिवणकामात मदत; दोन्ही भाऊ झाले IPS, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:28 PM2023-04-15T12:28:38+5:302023-04-15T12:29:41+5:30

आयपीएस पंकज कुमावत आणि अमित कुमावत यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया. पंकज आणि अमित कुमावत हे सामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणीत त्यांनी आयुष्य व्यतीत केले.

rajasthan tailor 2 sons pankaj kumawat and amit kumawat crack upsc became ips | वडील शिंपी, आईही करायची शिवणकामात मदत; दोन्ही भाऊ झाले IPS, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

वडील शिंपी, आईही करायची शिवणकामात मदत; दोन्ही भाऊ झाले IPS, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

googlenewsNext

कष्टाने, खूप मेहनत करून काही जण आपलं स्वप्न पूर्ण करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. आई-वडिलांनी कष्टाने शिकवल्यानंतर दोन भाऊ IPS झाले आहेत. आयपीएस पंकज कुमावत आणि अमित कुमावत यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया. पंकज आणि अमित कुमावत हे सामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणीत त्यांनी आयुष्य व्यतीत केले.

वडील सुभाष कुमावत हे शिंपीचे काम करायचे. वडिलांच्या कामात मदत करताना आई राजेश्वरी देवीही शिवणकाम करत असे. त्यांचे जीवन खूप संघर्षमय होते. मुलांनीही मन लावून अभ्यास केला आणि मेहनतीचे फळ मिळाले. शिक्षण घेत असताना दोन्ही भावांनी एकत्र अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले. पंकज आणि अमित यांनी UPSC ची नागरी सेवा परीक्षा एकत्र उत्तीर्ण केली.

दोन्ही भावांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, पंकज आणि अमित यांनी राजस्थानमधील झुंझुनू येथील भारती विद्या विहार शाळेत सुरुवातीपासून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर झुंझुनू अकादमीतून बारावी उत्तीर्ण झाले. त्यांनी आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज होती, त्यामुळे बीटेक केल्यानंतर पंकजला नोएडामधील एका खासगी कंपनीत नोकरीही लागली.

पंकजच्या नोकरीमुळे कुटुंबाचे आर्थिक संकट काही प्रमाणात हलके झाले. दोन्ही भावांसोबत त्यांच्या पालकांनीही हार मानली नाही. मुलांच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करून त्यांनी शिवणकाम केलं. 2018 मध्ये दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली होती, त्यानंतर पंकजला AIR 443, अमितला 600 गुण मिळाले होते. पंकजला आयपीएस पद मिळाले. 

2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात अमितला IRTS कॅडर मिळाले. 2019 मध्ये पुन्हा दोघांनी पेपर दिला, दुसऱ्यांदा अमितला AIR 423 आणि पंकजला 424 मिळाले. दुसऱ्यांदा दोघांना आयपीएस कॅडर मिळाली. पंकज आधीच आयपीएस होता. अमितही दुसऱ्यांदा आयपीएस झाला. मुलाखतीत पंकज आणि अमित म्हणाले होते की, आमच्यासाठी अभ्यास कठीण नव्हता, पालकांना अभ्यासाचा खर्च उचलणे कठीण होते. ते आम्हा दोघी भावांना नेहमी म्हणायचे की, शिकून मोठे व्हायचे आहे. आमचा सदैव पाठिंबा राहील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rajasthan tailor 2 sons pankaj kumawat and amit kumawat crack upsc became ips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.