राजस्थान ते दिल्ली.... सैन्यात भरती होण्यासाठी 2 दिवसांत 350 किमी धावला युवक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:51 PM2022-04-05T15:51:24+5:302022-04-05T15:53:08+5:30

राजस्थानच्या सीकर ते राजधानी दिल्लीपर्यंत हा युवक धावत आला होता

Rajasthan to Delhi .... Youth ran 350 km in 2 days to join the army from sikar of rajashan | राजस्थान ते दिल्ली.... सैन्यात भरती होण्यासाठी 2 दिवसांत 350 किमी धावला युवक

राजस्थान ते दिल्ली.... सैन्यात भरती होण्यासाठी 2 दिवसांत 350 किमी धावला युवक

Next

नवी दिल्ली - सैन्य दलात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करणाऱ्या प्रदीप मेहरा या 17 वर्षीय युवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मॅकडॉनल्डमध्ये काम करुन घरी जाताना तो दररोज 10 किमी धावत आपला सरावही करत होता. उत्तराखंडच्या प्रदीपच्या जिद्दीची कथा सर्वांनीच सोशल मीडियातून पाहिली होती. त्यानंतर, आता राजस्थानमधील एका 24 वर्षीय युवकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या युवकाने सैन्य दलात भरती होण्यासाठी तब्बल 350 किमी धावत प्रवास केला. 

राजस्थानच्या सीकर ते राजधानी दिल्लीपर्यंत हा युवक धावत आला होता. हाती तिरंगा झेंडा घेऊन 50 तासांत त्याने 350 किमीचं हे अंतर पार केलं. सुरेश भिंचर असं या युवकाचं नाव असून राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील तो रहिवाशी आहे. सैन्यभरती वेळेत होत नसल्याचा निषेध दर्शविण्यासाठी सुरेशने तब्बल 350 किमी धावत सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नागौर, सीकर, झुनझुन या त्याच्या रहिवाशी जिल्ह्यातील युवकांचे वय निघून जात आहे. मात्र, सैन्य भरती निघत नसल्याने त्याने वेगळ्या पद्धतीने हा निषेध नोंदवला. 


सुरेशच्या या निषेध धावची सर्वत्र चर्चा होत असून त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 24 वर्षीय सुरेशला सैन्य दलात भरती होण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून सैन्य दलात भरती होत नसल्याचे तो आणि त्याच्या गावांकडील युवक निराश असल्याचं सुरेशने म्हटलंय. 

Web Title: Rajasthan to Delhi .... Youth ran 350 km in 2 days to join the army from sikar of rajashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.