सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:16 PM2024-11-05T14:16:27+5:302024-11-05T14:18:32+5:30

तलावाच्या काठावर सेल्फी काढताना एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दोन टेबल टेनिसपटूंचा मृत्यू झाला.

rajasthan two minor table tennis players died tragically due to drowning in water taking selfie | सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

फोटो - आजतक

राजस्थानच्या शाहपुरा जिल्हा मुख्यालयाजवळ तलावाच्या काठावर सेल्फी काढताना एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दोन टेबल टेनिसपटूंचा मृत्यू झाला. मुलांच्या मृत्यूमुळे शाहपुरा शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.

शाहपुराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहपुरा येथील रहिवासी १२ वर्षीय श्लोक जागेतिया, शाहपुरा जिल्ह्याच्या मुख्य भागात असलेल्या विवेकानंद गव्हर्नमेंट मॉडेल स्कूलमध्ये नववीचा विद्यार्थी आहे. तसेच १५ वर्षीय रुद्र प्रताप सोडा हा इंडियन पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. 

राष्ट्रीय स्तरावर नुकतीच या मुलांची निवड झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही विद्यार्थी शासकीय मॉडेल स्कूलमध्ये असलेल्या खोलीत टेबल टेनिसचा सराव करत होते. सरावानंतर ते मॉडेल स्कूलसमोरील तलावाजवळ गेले आणि मोबाईलने सेल्फी काढू लागले, तेव्हा अचानक ते तलावात पडले, त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

सेल्फीमुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही, परंतु अशा धक्कादायक घटना अनेकदा समोर येतात. रील, फोटो आणि व्हिडीओच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हुशार मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 
 

Web Title: rajasthan two minor table tennis players died tragically due to drowning in water taking selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.