नियतीचा असाही खेळ! अंगणातून सोबतच निघाली दोन सख्ख्या भावांची अंत्ययात्रा, गावावर पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 09:31 AM2023-01-13T09:31:32+5:302023-01-13T09:33:59+5:30
Rajasthan : गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावातील नातं खूप चांगलं होतं. सोहम सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर थोडा कमजोर होता. मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च लहान भाऊ सुमेर सिंह करत होता.
Rajasthan : राजस्थानच्या बाडमेरमध्ये दोन सख्ख्या भावाच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लहान भावाच्या निधनानंतर घरी आलेल्या मोठ्या भावाचा पाण्याचा टाकीत पडून मृत्यू झाला. जेव्हा घरातून दोन्ही भावांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा सगळेच रडायला लागले होते. दोन्ही भावांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना बाडमेरच्या सिणधरी भागातील होडू गावातील आहे.
रिपोर्टनुसार, होडू गावातील 26 वर्षीय सुमेर सिंह गुजरातच्या सूरतमध्ये काम करत होता. 1 दिवसाआधी म्हणजे मंगळवारी तो पाय घसरून छतावरून खाली पडला होता. पण उपचारादरम्यान सुमेर सिंहचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं. लहान भावाच्या मृत्यूनंतर मोठ्या भावाला घरी बोलवण्यात आलं.
बुधवारी सकाळी सोहन सिंह घराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीतून बकेटीने पाणी काढत होता. तो अचानक त्यात पडला आणि त्याचाही मृत्यू झाला.
28 वर्षीय सोहन जयपूरमध्ये सेकंड ग्रेडचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. वडिलांची तब्येत बिघडली असं कारण सांगत सोहन सिंह याला घरी बोलवण्यात आलं. या घटनेनंतर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
असं सांगण्यात येत आहे की, जेव्हा बराच वेळ सोहन घरी परतला नाही तेव्हा लोकांनी टाकीजवळ जाऊन पाहिलं तर त्याचा मृतदेह पाण्यात तरंगत होता. लगेच याची सूचना पोलिसांना देण्यात आली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून चौकशी सुरू करण्यात आली. गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावातील नातं खूप चांगलं होतं. सोहम सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर थोडा कमजोर होता. मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च लहान भाऊ सुमेर सिंह करत होता.
पोलिसांनी सांगितलं की, एका भावाचा मृत्यू सूरतमध्ये छतावरून पडून झाला तर दुसरा भाऊ पाण्यात टाकीत पडला होता. कुटुंबियांनी सांगितलं की, टाकीत पडल्याने सोहमचा मृत्यू झाला. आत्महत्येचाही संशय व्यक्त केला जात आहे. अशात पोलीस चौकशी करत आहेत.