राजस्थानातील बसपचे आमदार मायावतींना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:21 AM2019-05-29T04:21:46+5:302019-05-29T04:22:03+5:30

लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर राजस्थानमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली.

Rajasthan's BSP will meet Mayawati | राजस्थानातील बसपचे आमदार मायावतींना भेटणार

राजस्थानातील बसपचे आमदार मायावतींना भेटणार

Next

जयपूर : लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर राजस्थानमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली. भाजपने अशोक गेहलोत सरकार अल्पमतात गेल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार पक्षाध्यक्ष मायावती यांना दिल्लीत १ जून रोजी भेटणार आहेत.
बसपचे आमदारवाजिब अली यांनी सांगितले की, या बैठकीत राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाने केलेल्या कामगिरीवर चर्चा केली जाईल. आम्ही भविष्यातील रणनीतीवरसुद्धा चर्चा करणार आहोत.
अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस सरकारला आमच्या पक्षाचा पाठिंबा कायम राहणार आहे. पाठिंबा काढून घेण्याचा आमचा अजिबात विचार नाही. बसप आमदार राज्यपाल कल्याण सिंह यांना सोमवारी भेटणार होते. ती भेट ऐन वेळी रद्द करण्यात आली. मायावती यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना भेटण्याचा निर्णय होणार आहे.
राजस्थान विधानसभेच्या २00 आमदारांपैकी १00 काँग्रेसचे आहेत. त्याखेरीज आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराच्या मदतीने कॉँग्रेस सरकार चालवित आहे. बसपच्या ६ आमदारांचा तसेच ६ अपक्षांचाही सरकारला पाठिंबा आहे.

Web Title: Rajasthan's BSP will meet Mayawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.