राजदीप सरदेसाईंनी घेतली ट्विटरवरून एग्झिट
By admin | Published: May 3, 2016 01:30 PM2016-05-03T13:30:46+5:302016-05-03T13:30:46+5:30
सोशल मीडियावर होणाऱ्या हल्ल्यांना कंटाळून ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी ट्विटरवरून एग्झिट घेतली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सोशल मीडियावर होणाऱ्या हल्ल्यांना कंटाळून ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी ट्विटरवरून एग्झिट घेतली आहे. "विरोधकांनी किती खालची पातळी गाठायची? माझं अकाउंट हॅक करायचं, खोटो मेसेजेस टाकायचे, हे सगळं कधी थांबणार?" असं विचारत राजदीपनी ट्विटर अकाउंट डिसेबल करायची हीच वेळ असल्याचं म्हटलं आणि एग्झिट घेतली.
गेली काही वर्षे राजदीप सरदेसाई आणि त्यांचे विरोधक विशेषत: भाजपा समर्थक यांच्यामध्ये ऑनलाइन युद्ध सुरू होतं. राजदीपनी काही म्हणायचं आणि विरोधकांनी तुटून पडायचं रा शिरस्ता झाला होता.
गेल्या काही दिवसांमध्ये अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी पण सोशल मीडियावर राजदीप यांच्या नावाचा गजर सुरू झाला होता. अगुस्ता वेस्टलँडने भारतातला मीडिया मॅनेज करण्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले असल्याच्या बातम्या आल्या आणि सोशल मीडियानं हे कोण पत्रकार आहेत, ते बाहेर यायला हवं अशी मागणी केली, तर काही जणांनी राजदीपच असणार असं घोषितही करून टाकलं.
राजदीप सरदेसाईंच्या खात्यावरून काही विरोधकांना थेट मेसेज गेले तेही अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करणारे होते. हे मेसेजेस आपण टाकले नसून आपलं अकाउंट हॅक केल्याचा दावा राजदीपनी केला.
आता या सगळ्यामधलं काय खरं नी काय खोटं हे कळणं या क्षणी अवघड आहे. परंतु, सोशल मीडियावर राजदीप सरदेसाई व बरखा दत्त एका बाजुला आणि अदृष्य पण अत्यंत असे आक्रमक विरोधक दुसऱ्या बाजुला असा हा सामना अनेक महिने सुरू होता. सध्या तरी राजदीपनी या सोशल मीडिया वॉरपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.