मध्य रेल्वेवर राजधानी यापुढे दररोज धावणार, प्रवाशांना मिळणार नवीन वर्षाची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 04:44 AM2021-01-18T04:44:09+5:302021-01-18T04:48:12+5:30
सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी ४ वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी ९.५५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते.
मुंबई : प्रवाशांना मध्य रेल्वेने नवीन वर्षाची भेट दिली असून, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस दररोज धावणार आहे. राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारा चालविली जाणारी सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे. मध्य रेल्वेने कोरोना संक्रमणाचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात मेल, एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्या निलंबित केल्या होत्या. ३० डिसेंबर २०२०पासून राजधानी एक्सप्रेस ही विशेष गाडी आठवड्यातून चार दिवस सुरू करण्यात आली होती.
२०२१मध्ये मध्य रेल्वेने सकारात्मकपणे ही गाडी सुरू केली आणि राजधानी एक्स्प्रेसच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त या ट्रेनची वारंवारता आठवड्याच्या ४ दिवसांवरून दररोज करण्यात आली. याचा निश्चितच राजधानीच्या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना तसेच या प्रतिष्ठित ट्रेनच्या मार्गावरील थांब्यांच्या स्थानकांना नक्कीच फायदा होईल.
सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी ४ वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी ९.५५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते.
परतीच्या दिशेने हजरत निजामुद्दीनहून दररोज ४.५५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ११.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक
- मध्य रेल्वेने कोरोनाचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात मेल, एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्या प्रलंबित केल्या होत्या. ३० डिसेंबर २०२० पासून राजधानी एक्सप्रेस ही विशेष गाडी आठवड्यातून चार दिवस सुरू करण्यात आली होती. राजधानी एक्सप्रेस ही रेल्वेद्वारा चालविली जाणारी प्रतिष्ठित गाड्यांपैकी आहे.