सातेरी महादेव देवस्थानचे राजेंद्र आजगावकर प्रशासक
By Admin | Published: August 17, 2015 12:08 AM2015-08-17T00:08:07+5:302015-08-17T00:08:07+5:30
हणखणे : राज्य शासनाने कासारवर्णे-पेडणे येथील सातेरी महादेव देवस्थान ताब्यात घेऊन प्रशासक म्हणून मामलेदार राजेंद्र आजगावकर यांची नेमणूक केली. देवस्थानचा प्रसासक म्हणून मामलेदार आजगावकर यांनी शनिवारी (दि. 15) देवस्थानचा ताबा घेतला.
ह खणे : राज्य शासनाने कासारवर्णे-पेडणे येथील सातेरी महादेव देवस्थान ताब्यात घेऊन प्रशासक म्हणून मामलेदार राजेंद्र आजगावकर यांची नेमणूक केली. देवस्थानचा प्रसासक म्हणून मामलेदार आजगावकर यांनी शनिवारी (दि. 15) देवस्थानचा ताबा घेतला.याबाबत माहिती देताना राजेंद्र आजगावकर यांनी सांगितले, सातेरी महादेव देवस्थान कासारवर्णेच्या महाजनांच्या दोन गटातील वादामुळे अनेक तक्रारी सरकार दरबारी आल्या होत्या. त्याची चौकशी करण्यासाठी दोन्ही गटांना नोटिसा बजावल्यानंतर चौकशीअंती त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन शासनाने देवस्थानचे अध्यक्ष वासु हरी नाईक यांच्या अधिपत्याखालील समिती बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केली.काहींची घरे देवस्थान कार्यक्रमातून वगळणे, काहींच्या घरी ब्रा?ाणांना जाण्यास मनाई करणे यासारख्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. आता प्रशासकाची नेमणूक झाल्याने आणि त्या पदावर शासनाने आपली नेमणूक केल्याने यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, अशी माहिती आजगावकर यांनी दिली.सुरुवातीला येथील सातेरी मंदिरातील वस्तूंचा पंचनामा करून तेथील ताबा घेतला. याप्रसंगी महाजनांच्या दोन्ही गटातील लोक तसेच महिला उपस्थित होत्या. ताबा घेतल्यानंतर सातेरी मंदिराच्या मुख्य दरवाजाला नवीन कुलूप लावून एक चावी पुजारी महेश मराठे यांच्याकडे दिली.त्यानंतर तेथून जवळच असलेल्या महादेव मंदिराकडे जाऊन तेथील वस्तूंचा पंचनामा करण्यासाठी मामलेदार गेले असता देवस्थानचे माजी अध्यक्ष वासू हरी नाईक यांनी त्या ठिकाणी येण्यास नकार दर्शवल्याने आणि बोलावूनही नाईक न आल्याने मामलेदारांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या सहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडले. तसेच आतील वस्तूंचा पंचनामा केला. दुपारी सुरू झालेली कार्यवाही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालली होती.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसफाटा मोठय़ा प्रमाणात होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उर्वरित ताबा मंगळवार दि. 18 रोजी देणार असल्याचे समितीने मामलेदारांना सांगितल्याने उर्वरित ताबा मंगळवारी घेणार आहेत. त्यामुळे नियमित कार्यक्रम पार पडतील, अशी आजगावकर यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. (प्रतिनिधी)फोटो : पंचनामा करताना मामलेदार राजेंद्र आजगावकर व कर्मचारी (महादेव च्यारी)