'लगान'मधला 'गुरन' राजेश विवेक यांचे निधन
By admin | Published: January 15, 2016 08:30 AM2016-01-15T08:30:01+5:302016-01-15T11:53:55+5:30
लगान, स्वदेस या गाजलेल्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे आज हैदराबादमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - लगान, स्वदेस या गाजलेल्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते राजेश विवेक यांचे आज हैदराबादमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. हैदराबादमध्ये ते एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते तिथे त्यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले अशी माहिती विवेक यांचे मित्र विष्णू शर्मा यांनी दिली.
ऑस्कर पुरस्कारापर्यंत मजल मारणा-या 'लगान' चित्रपटात त्यांनी साकारलेली गुरनची भूमिका प्रचंड गाजली होती. स्वदेस चित्रपटात त्यांनी पोस्टमास्तरची भूमिका केली होती. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या जुनून (१९७८) चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदापर्ण केले होते. 'महाभारत', 'भारत एक खोज' आणि 'अघोरी' या गाजलेल्या दूरचित्रवाहीनी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
सुरुवातीला 'विराना', 'जोशिले' या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेतून आपली छाप उमटवली होती. त्यानंतर त्यांनी विनोदी भूमिकेतून आपली छाप उमटवली. बंटी और बबली, भूत अंकल, अग्निपथ, सन ऑफ सरदार या चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. गाजलेल्या बँडिट क्वीन (१९९४) चित्रपटात त्यांनी दरोडेखोराची भूमिका केली होती.