राजघाट विहिंपच्या बैठकीसाठी बंद, गांधी प्रतिष्ठानने केली टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:42 AM2018-06-28T04:42:03+5:302018-06-28T04:42:08+5:30
आणीबाणीविरुद्ध देशभरात काँग्रेसविरोधी प्र्रचार करणाऱ्या भाजपाच्या कारकिर्दीत महात्मा गांधींचे समाधीस्थळ सलग दोन दिवस बंद ठेवण्याची ऐतिहासिक नोंद झाली.
नवी दिल्ली : आणीबाणीविरुद्ध देशभरात काँग्रेसविरोधी प्र्रचार करणाऱ्या भाजपाच्या कारकिर्दीत महात्मा गांधींचे समाधीस्थळ सलग दोन दिवस बंद ठेवण्याची ऐतिहासिक नोंद झाली. समाधी निर्मितीनंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. एरवी राष्ट्रप्रमुखांच्या, व्हीव्हीआयपींच्या भेटीदरम्यान काही तासांसाठी राजघाट लोकांसाठी बंद ठेवला जातो, परंतु २४ व २५ जून रोजी गांधी स्मृती व दर्शन समितीच्या परिसरात विश्व हिंदू परिषदेच्या बैठक सुरू असल्यानेच राजघाट बंद ठेवण्यात आला, असा आरोप गांधी शांती प्रतिष्ठानने केला. राजघाटची मनमानी टाळेबंदी राष्ट्रभावनेचा अपमान करणारी आहे, अशी टीका प्रतिष्ठानने केली. देशाच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपºयातून राजघाटावर येणाºया लाखो लोकांची तो बंद ठेवल्याने निराशा झाल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.
या बैठकीसाठीच महात्मा गांधींचे समाधीस्थळ सामान्यांसाठी बंद करण्यात आले असल्यास, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याच्या निषेधार्थ देशवासीयांनी राजघाटावर २९ जूनला निदर्शनांमध्ये सहभागी व्हावे, असे पत्र प्रतिष्ठानने प्रसिद्ध केले आहे.