रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ? वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ

By admin | Published: February 6, 2017 09:54 AM2017-02-06T09:54:52+5:302017-02-06T12:51:25+5:30

रजनीकांत यांनी ताकद विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे

Rajinikanth to enter politics? Tamil Nadu sensation due to the statement | रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ? वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ

रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ? वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ

Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 6 - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी काहीही केलं की खळबळ माजतेच, पण सध्या त्यांनी 'ताकद' विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे. यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रजनीकांत यांनी मात्र स्पष्टीकरण देत आपण 'ताकद' शब्दाचा प्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं म्हटलं आहे. 
 
(सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून दिली १० रुपयांची नोट)
(भेट दोन रजनीकांतची)
 
रजनींकात स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करतील असे अंदाज लावले जात आहेत. यासाठी दक्षिण भारतात पोहचण्याचा प्रयत्न करु पाहणा-या भाजपाची साथ त्यांना मिळू शकते. तामिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रजनीकांत नाराज असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरील अनेकांनी याचा संबंध जयललितांच्या निधनाशी जोडला असून त्यामुळेच ते नाराज असल्याचा दावा केला आहे. 
 
(अम्मांनंतर ‘चिनम्मा’)
 
तामिळनाडूत अम्मांनंतर आता चिनम्मा यांचे राज्य असणार असून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. रजनीकांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिस्थितीतून राज्याला वाचवण्याचं आवाहन केलं आहे. 
 
रजनीकांतच्या एका वक्तव्यामुळे झाला होता जयललितांचा दारुण पराभव - 
रजनीकांत सध्या जयललितांचं गुणगाण गात असले तरी 1996 रोजी त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे जयललितांचा दारुण पराभव झाला होता. 'जयललिता यांना जर सत्ता मिळाली, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही,' असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर 1996 ची निवडणूक जयललिता हारल्या होत्या. 
 
मात्र 10 वर्षानंतर रजनीकांत यांचं मत बददलं आणि जयललितांचं कौतुक करताना 'अष्टलक्ष्मीचा अवतार' असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र यानंतरही दोघांचं घर जवळ असूनही रजनीकांत यांनी जयललितांपासून अंतरच ठेवलं. 
2014 रोजी लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीनंतरही रजनीकांत राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रजनीकांत यांनी यासाठी नकार दिला. 
 
तामिळनाडूत प्रवेश करण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत आहे. यासाठी रजनीकांत यांना मनवण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. जयललिता यांच्या निधनानंतर या प्रयत्नांना जोर आला आहे असं सुत्रांकडून कळलं आहे. 
 
दुसरीकडे रजनीकांत यांनी मात्र आपण 'ताकद' शब्दप्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'जर प्रसिद्धी आणि पैशाला एकीकडे ठेवून, तुम्ही अध्यात्माशी जोडले जाणार का ? असा सवाल मला कोणी विचारला, तर मी अध्यात्म निवडेन. कारण अध्यात्मात ताकद आहे. चुकीचं समजू नका पण मला ताकद आवडते,' असं रजनीकांत बोलले आहेत. 
 

Web Title: Rajinikanth to enter politics? Tamil Nadu sensation due to the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.