कावेरी मंडळासाठी रजनीकांत, हासन यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:00 AM2018-04-09T02:00:45+5:302018-04-09T02:00:45+5:30
कावेरी व्यवस्थापन मंडळ (सीएमबी) स्थापन करण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ तमिळ चित्रपटसृष्टीने रविवारी एक दिवसाच्या उपोषणात भाग घेतला.
Next
चेन्नई : कावेरी व्यवस्थापन मंडळ (सीएमबी) स्थापन करण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ तमिळ चित्रपटसृष्टीने रविवारी एक दिवसाच्या उपोषणात भाग घेतला. येथील वल्लूवरकोट्टम येथे झालेल्या या उपोषणात प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत व कमल हासन सहभागी झाले होते.
द साउथ इंडियन फिल्म आर्टिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस व अभिनेते विशाल आणि अध्यक्ष नासर, अभिनेते विजय, त्यांचे वडील व प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस. ए. चंद्रशेखर यांचा या उपोषणात सहभाग होता. या आंदोलनात चित्रपट उद्योगाने थुथुकुडीतील स्टरलाइट कूपर कारखाना बंद करण्याचीही मागणी केली.