रजनीकांत यांच्याशी युती नाही - कमल हसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:49 AM2018-02-12T00:49:30+5:302018-02-12T00:49:53+5:30

रजनीकांत आणि कमल हसन हे दोन मातब्बर दाक्षिणी अभिनेते राजकीय पटलावर सक्रिय झाल्याने तमिळनाडूच्या राजकारणातील रंगत वाढली असली तरी निवडणुकीत रजनीकांत यांच्याशी युती करण्याची शक्यता कमल हसन यांनी फेटाळली आहे.

 Rajinikanth is not a coalition - Kamal Hassan | रजनीकांत यांच्याशी युती नाही - कमल हसन

रजनीकांत यांच्याशी युती नाही - कमल हसन

googlenewsNext

रजनीकेंब्रिज: रजनीकांत आणि कमल हसन हे दोन मातब्बर दाक्षिणी अभिनेते राजकीय पटलावर सक्रिय झाल्याने तमिळनाडूच्या राजकारणातील रंगत वाढली असली तरी निवडणुकीत रजनीकांत यांच्याशी युती करण्याची शक्यता कमल हसन यांनी फेटाळली आहे. रजनीकांत हे भगवे राजकारण करीत असून ते भाजपकडे झुकलेले असल्याने त्यांच्याशी युती करणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे.
हार्वर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात कमल हसन यांच्या वेबसाइटचे उद््घाटन झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी कमल हसन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात कमल हसन म्हणाले की, रजनीकांत यांनी भगवे राजकारण करणे कायम ठेवले तर त्यांच्याशी मी युती करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. परंतु मैत्री व राजकारण या दोन पूर्णपणे वेगळ््या गोष्टी आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कमल हसन म्हणाले की, आम्हा दोघांच्या राजकीय पक्षांमध्ये काही विचार समान असतील किंवा दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये काही समान मुद्दे असतील तरच युती होण्याची शक्यता निर्माण झाली असती. राज्यातील निवडणुकांच्या आधी मी कोणाशीही युती करणार नाही.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जर कोणालाच बहुमत मिळाले नाही तर मी विरोधी पक्षात बसणे पसंत करेन असे सांगून कमल हसन म्हणाले की, सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही पक्षात जायची मला इच्छा नव्हती. त्यामुळे मी स्वत:चा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. केजरीवाल व अन्य पक्षांनी दिलेले युतीचे प्रस्ताव मी स्वीकारले नाहीत.

Web Title:  Rajinikanth is not a coalition - Kamal Hassan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.