Rajinikanth : हा तर 'खूप मोठा' सन्मान, रजनीकांतने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 02:07 PM2021-04-01T14:07:55+5:302021-04-01T14:14:23+5:30

Rajinikanth :माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला

Rajinikanth : This is a 'very big' honor, Rajinikanth thanked Prime Minister Modi | Rajinikanth : हा तर 'खूप मोठा' सन्मान, रजनीकांतने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Rajinikanth : हा तर 'खूप मोठा' सन्मान, रजनीकांतने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Next
ठळक मुद्देसोशल मीडियावर रजनीकांत हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. अनेक दिग्गजांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन रजनीकांतचे अभिनंदन केले. 

नवी दिल्ली: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने कोट्यवधी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर, जगभरातून रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांनी रजनीकांतचे अभिनंदन केले. त्याबद्दल, रजनीकांतने मोदींचे आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत.    

माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला. त्यावेळी, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूचाही समावेश आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थलयवा रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्यात आला का, असा प्रश्न जावडेकर यांना विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर जावडेकर यांनी सडेतोड उत्तर दिले. (prakash javadekar react on rajinikanth to be conferred with dadasaheb phalke award) रजनीकांत यांना पुरस्कार जाहीर होताच, सोशल मीडियावर रजनीकांत हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. अनेक दिग्गजांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन रजनीकांतचे अभिनंदन केले. 


नरेंद्र मोदींच्या ट्विटला रिप्लाय देत, रजनीकांतनेही मोदींचे आभार मानले. आपल्या शुभेच्छांचा मनपूर्वक स्विकार करतो, दादासाहेब फाळके या महान सन्मानासाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपले आणि भारत सरकारचे मनापासून आभार, असेही रजनीकांतने म्हटले. दरम्यान, रजनी यांनी तमिळ भाषेतही एक पत्र लिहिले असून ते आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. या पत्रातूनही रजनीकांते सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. 

काय म्हणाले जावडेकर 

दादासाहेब फाळके पुरस्कार सिनेसृष्टीशी निगडीत आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हा पुरस्कारासाठी नेमणूक केलेल्या पाच समीक्षकांनी एकत्रितपणे रजनीकांत यांच्या नावाचा निर्णय घेतला. यात राजकारण कुठून आले, असे स्पष्ट करत रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाविषयी चर्चा केली. गेल्या 5 दशकांपासून रजनीकांत सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी असलेल्या ज्युरींनी एकमताने रजनीकांत यांना हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला, असेही जावडेकर म्हणाले. 

राजकारणात न उतरण्याचा निर्णय

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र, अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.

Web Title: Rajinikanth : This is a 'very big' honor, Rajinikanth thanked Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.