लोकसभा निवडणुकीसाठी रजनीकांत यांची मोठी घोषणा; दिला हा इशारा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 11:12 AM2019-02-17T11:12:06+5:302019-02-17T11:31:58+5:30
रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते भाजपात जाणार असल्याचीही संघासह अनेक भाजपा नेत्यांकडून वक्तव्ये होत होती.
चेन्नई : शिवाजी राव गायकवाड अर्थात दक्षिणेतील महाअभिनेता रजनीकांत यांनी आज लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मोठी घोषणा केली आहे. यामुळे त्यांचे चाहते. कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
रजनीकांत यांनी गेल्यावर्षी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच ते भाजपात जाणार असल्याचीही संघासह अनेक भाजपा नेत्यांकडून वक्तव्ये होत होती. मात्र, त्यांनी स्वत:चा पक्ष काढण्याचे ठरविले होते. यामुळे रजनीकांत लोकसभा निवडणूक लढविणार अशी चर्चाही जोर धरत होती. मात्र, रजनीकांत यांनी आज त्यावर पडदा टाकत राजकीय फुग्यातील हवाच काढून घेतली आहे.
Rajinikanth in a statement has stated that his party or he will not be contesting in the Lok Sabha elections 2019. Also, he has mentioned that his photo or party symbol should strictly not be used for any propaganda. (File pic) pic.twitter.com/NTuSdYrExv
— ANI (@ANI) February 17, 2019
आपला पक्ष किंवा आपण येती लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणीही वापरू नये असेही त्यांनी बजावले आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले असून दक्षिणेतील रजनीकांत नावाचे वादळ यंदाच्या लोकसभा निवडणुकीततरी शांतच असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रजनीकांत यांनी म्हटले की, आपला पक्ष कोणत्याही इतर पक्षाला पाठिंबा किंवा मदत करणार नाही. यामुळे कोणीही आपल्या पक्षाचा झेंडा, फोटो किंवा अन्य तपशील वापरू नये. तसेच रजनी मक्कल मंद्रम किंवा रजनी फॅन क्लब अशी नावेही वापरू नयेत. तसेच तामिळनाडूला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे जो पक्ष त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला लोकांचा पाठिंबा मिळेल.