राजीव गांधींच्या मारेकरीला पॅरोल
By Admin | Published: February 25, 2016 12:17 AM2016-02-25T00:17:50+5:302016-02-25T00:17:50+5:30
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेली नलिनी श्रीहरन हिला बुधवारी तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी १२ तासांचा
वेल्लोर : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेली नलिनी श्रीहरन हिला बुधवारी तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी १२ तासांचा पॅरोल देण्यात आला.
नलिनीची १२ तासांचा पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती महिला कारागृहातील एका अधिकाऱ्याने दिली. नलिनी वेल्लोर येथील केंद्रीय कारागृहातून सकाळी ६.५० वाजता पोलीस बंदोबस्तात आपल्या घरी रवाना झाली. त्यानंतर चेन्नई येथे तिचे वडील शंकर नारायणन यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थि त राहून सायंकाळी पुन्हा पोलीस बंदोबस्तात कारागृहात परतली, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयाने नलिनीला २८ जानेवारी १९९८ रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. तामिळनाडूच्या राज्यपालांनी २४ एप्रिल २००० रोजी नलिनीची शिक्षा जन्मठेपेत बदलवली होती. गेल्यावर्षी नलिनीने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करीत तामिळनाडू सरकारकडे मुदतीपूर्वी सुटका करण्यासाठी केलेल्या अर्जावर विचार करण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती. आपण २४ वर्षांहून अधिक शिक्षा भोगली आहे, असा तर्क तिने दिला होता. (वृत्तसंस्था)