राजीव गांधींनी केली होती हायड्रोजन बॉम्ब चाचणीची तयारी - CIA

By admin | Published: January 24, 2017 09:45 AM2017-01-24T09:45:55+5:302017-01-24T10:12:10+5:30

भारताने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळादरम्यान 1985 मध्ये पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला सडेतोड उत्तर देण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब चाचणी करण्याची तयारी केली होती

Rajiv Gandhi prepared for the test of hydrogen bomb - CIA | राजीव गांधींनी केली होती हायड्रोजन बॉम्ब चाचणीची तयारी - CIA

राजीव गांधींनी केली होती हायड्रोजन बॉम्ब चाचणीची तयारी - CIA

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24 - भारताने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळादरम्यान 1985 मध्ये पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला सडेतोड उत्तर देण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब चाचणी करण्याची तयारी केली होती, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने दिली आहे. 
 
त्यावेळी दक्षिण आशियामध्ये आण्विक शस्त्रात्रांची स्पर्धा होण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेतील तत्कालीन रोनाल्ड रिगन सरकारने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी आणि तणाव कमी करण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवण्याचा विचार केला होता.  
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीद्वारे (CIA)सार्वजनिक करण्यात आलेल्या जवळपास  9,30,000 गोपनीय दस्तऐवजांद्वारे ही माहिती समोर आली आहे.  
 
CIAने या दस्तऐवजांमधील 12 लाखांहून अधिक पाने ऑनलाईन पोस्ट केली आहेत. यात 1980च्या दशकादरम्यानची भारताच्या आण्विक शस्त्रात्रांच्या क्षमतेबाबतची मनोरंजक माहिती आहे.  भारतीय सुरक्षा अत्यंत चोख असल्याकारणाने भारताच्या आण्विक कार्यक्रमाबाबत तपशील हस्तगत करण्यात समस्यांचा सामना करावा लागला, असे एका दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.  
 
CIA ने सांगितले की, राजीव गांधी सरकारला ज्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी करू इच्छुक होते ती चाचणी,  11 वर्षांपूर्वी इंदिरा गांधी सरकारतर्फे करण्यात आलेल्या चाचणीपेक्षाही अधिक शक्तिशाली होती. भारत त्यावेळी आण्विक तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानपेक्षा कैकपटीने पुढे होता. राजीव गांधी आण्विक कार्यक्रमांना पुढे नेण्यास पुढाकार घेत नव्हते, मात्र 1985 सालच्या सुरुवातीला पाकिस्तानकडून आण्विक शस्त्रात्र बनवण्याच्या योजनेवर वारंवार प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपला निर्णय बदलला.
 
त्यांनी 4 मे 1985 साली म्हटले होते की, 'पाकिस्तानकडून आण्विक शस्त्रात्र बनवण्यासाठी होणा-या प्रयत्नांनी भारताला न्युक्लिअर पॉलिसीचे पुनरावलोकन करण्यासाठी भाग पाडले आहे'. मुंबईमधील भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधील 36 संशोधकांच्या एका टीमने हायड्रोजन बॉम्बची निर्मित केली होती, असे CIA ने सांगितले. भारताकडून आण्विक शस्त्रात्रांसाठी प्लुटोनियम जमा करण्यात येत होता, असा दावाही CIA ने केला आहे. 
 
दरम्यान, CIAच्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय, राजकीय आणि आर्थिक परिणामांच्या भीतीपोटी पाकिस्तानच्या न्युक्लियर प्लांट्सवर हल्ला केला गेला नाही.  एका दस्तऐवजात तर असे नमूद करण्यात आले आहे की, 'दीर्घकालीन भारतीय सुरक्षेत पाकिस्तानला नव्हे तर चीनला धोका असल्याचे मानले जात आहे'.
 
अमेरिका सरकारतर्फे पाठवण्यात येणा-या प्रतिनिधीसंदर्भातील दस्तऐवजात असे सांगण्यात आले आहे की, भारताला ही बाब मान्य नव्हती, मात्र तरीही त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी भारत तयार होता.  त्याकाळी दक्षिण आशियामध्ये पाकिस्तानला अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण सहकारी म्हणून मानले जायचे तर भारताला सोव्हिएत युनियनचा मित्र मानले जायचे.  
 
दरम्यान, तत्कालीन राजीव गांधी सरकारने  हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली नाही. 1998 मध्ये अटल बिहारी वाजयेपी सरकारने अणु बॉम्बची चाचणी केली होती. पाकिस्ताननंही यानंतर अशाप्रकारची चाचणी केली. CIAने असेही म्हटले की, 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानात झालेल्या युद्धापूर्वीची गोपनीय माहिती मिळू शकली असती. 
 

Web Title: Rajiv Gandhi prepared for the test of hydrogen bomb - CIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.