सीआरपीएफच्या महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती
By admin | Published: April 26, 2017 08:09 PM2017-04-26T20:09:29+5:302017-04-26T20:13:21+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिली, दि. 26 - केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील सुकमा जिल्हात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. त्यानंतर लगेच सीआरपीएफच्या महासंचालकपदी 1983 च्या उत्तर प्रदेश कॅडर बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राजीव राय भटनागर यांच्याकडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) महासंचालकपदाची जबाबदारी आहे. तर, सीआरपीएफच्या कार्यकारी महानिरीक्षकपदी सुदीप लखटकिया आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राजीव राय भटनागर यांनी निवड केली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफच्या महासंचालकपदावरुन के. दुर्गा प्रसाद निवृत्त झाल्यानंतर त्याजागी कोणाचीही निवड करण्यात आली नव्हती.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या महासंचालकपदासाठी 1983 बॅचचे आयपीएस अधिकारी आर. के. पचनंदा यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, आर. के. पचनंदा यांची आयटीबीपीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते एनडीआरएफच्या महासंचालकपदी कार्यरत आहेत.
#FLASH: Rajiv Rai Bhatnagar, 1983 Batch of IPS has been appointed new DG CRPF pic.twitter.com/qEx7CHLOfk
— ANI (@ANI_news) April 26, 2017
R K Pachnanda of the 1983 batch, West Bengal cadre has been appointed DG ITBP. pic.twitter.com/Moc611LVBH
— ANI (@ANI_news) April 26, 2017