राजनाथसिंह यांना ‘जी-मेल’चा ईमेल आयडीच नाही!
By admin | Published: August 26, 2015 03:46 AM2015-08-26T03:46:34+5:302015-08-26T10:24:08+5:30
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा नरेंद्र मोदी सरकारमधील सर्वांत वजनदार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात येतो आणि इंटेलिजन्स ब्युरो आणि विविध केंद्रीय निमलष्करी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा नरेंद्र मोदी सरकारमधील सर्वांत वजनदार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात येतो आणि इंटेलिजन्स ब्युरो आणि विविध केंद्रीय निमलष्करी दले त्यांना रिपोर्टही करतात; मात्र असे असतानाही राजनाथसिंह यांना आपल्या पसंतीचा अधिकृत जी-मेल आयडी मिळविता आलेला नाही.
राजनाथसिंह यांची जी-मेल लॉगीन सुरू करायची इच्छा आहे आणि हे जी-मेल लॉगीन आपल्या @HMOIndia या अधिकृत टिष्ट्वटर हँडलशी मिळतेजुळते असावे असे त्यांना वाटते; परंतु त्यांच्या आधीच कुणीतरी जी-मेल अकाऊंट तयार करून हा आयडी आपल्या नावावर करून घेतला आहे.
हा आयडी वापरून आपले जी-मेल अकाऊंट तयार करणाऱ्याचे नाव राजनाथसिंह आणि त्यांच्या गृहमंत्रालयाला अद्याप शोधता आलेले नाही; परंतु राजनाथसिंह यांनी या अज्ञात अकाऊंटधारकाला आपला हा आयडी सोडण्याची विनंती केली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)