PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 03:08 PM2019-10-20T15:08:29+5:302019-10-20T15:14:13+5:30

भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.  

Rajnath Singh General Bipin Rawat In Touch After Army Attack Pakistan After Ceasefire Violation | PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात

PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात

Next

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे 11 सैनिक आणि 22 हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय लष्काराच्या कारवाईनंतर केंद्रीय मंत्रालय अलर्ट असून संरक्षण मंत्रालय सुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे. या कारवाई संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत आहेत.  

आज सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरा दाखल मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.  

भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये घुसून कारवाई सुरू केली आहे. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला आहे. या कारवाईत कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर 22 हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
पाकव्याप्त काश्मीरमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. PoKमधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत आहेत. तसेच 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीनं या क्षेत्राला अशांत ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय आहेत.

अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या बुधवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतावादी संघटनेचे सदस्य होते.  ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर नासिर चद्रू याचाही समावेश आहे.  

Web Title: Rajnath Singh General Bipin Rawat In Touch After Army Attack Pakistan After Ceasefire Violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.