'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 08:10 PM2024-09-08T20:10:46+5:302024-09-08T20:11:13+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील प्रचार सभेतून पाकिस्तानला सुनावले.
Rajnath Singh in Jammu-Kashmir : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी(दि.8) निवडणूक प्रचारासाठी जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये पोहोचले. यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत भारत कधीही दहशतवाद सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले. पाकिस्ताननेजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण ठेवले, तर भारत चर्चा करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.
आज जम्मू-कश्मीर Terrorism नहीं Tourism स्पॉट के रूप में जाना जाता है।
— BJP Jammu & Kashmir (@BJP4JnK) September 8, 2024
- केन्द्रीय रक्षा मंत्री श्री @rajnathsinghpic.twitter.com/pxWwEqUU9r
पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा!
भाजपचे उमेदवार मोहम्मद सलीम भट यांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह रामबन जिल्ह्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संविधानातील कलम 370 रद्द करण्याचा उद्देश जम्मू-काश्मीरमधील लोकांचे दुःख संपवणे आणि हा प्रदेश समृद्ध करणे हा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया मान्य करणार नाही. काही लोक पाकिस्तानशी चर्चा करण्याचे सल्ले दत आहेत. शेजाऱ्यांशी चांगले संबंध कुणाला नको आहेत? पण, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.
धारा-370 किसी कीमत पर वापिस नहीं आ सकती।
— BJP Jammu & Kashmir (@BJP4JnK) September 8, 2024
- केन्द्रीय रक्षा मंत्री श्री @rajnathsinghpic.twitter.com/CB8NhBwmE9
...तर PoKवालेही भारतात जायचे म्हणतील
राजनाथ सिंह पुढे म्हणतात, काश्मीरमध्ये दहशतवादी घटना सामान्य झाल्या आहेत. या दहशतवादी घटनांमध्ये बळी पडलेल्यांपैकी 85 टक्के मुस्लिम समाजाचे लोक आहेत. राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतात सामील होण्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला आमचे समजतो, पण पाकिस्तान तुम्हाला परदेशी समजतो. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. भाजपला मत द्या, जेणेकरून आम्ही या प्रदेशात सर्वांगीण विकास करू शकू. राज्यातील विकास पाहून पीओकेमधील लोक भारतात जायचे आहे, असे म्हणतील.