"हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:28 PM2020-07-05T14:28:58+5:302020-07-05T16:32:54+5:30

रविवारी राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे कोविड सेंटरला भेट दिली. त्यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील होते.

Rajnath Singh We Are Ready On Border When Asked About China Situation | "हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो"

"हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो"

Next
ठळक मुद्देचीनसोबतच्या सीमा वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.भारताने सीमावर्ती भागात चीनच्या बरोबरीने लष्काराचे जवान तैनात केले आहेत.

नवी दिल्ली : चीनसोबतच्या सीमा वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारत प्रत्येक आघाडीवर सज्ज आहे, असे राजनाथ सिंह  म्हणाले. रविवारी राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे कोविड सेंटरला भेट दिली. त्यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी कोरोना आणि सीमावाद यासंबधी प्रश्नावर पत्राकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "सर्व ठिकाणी आमची तयारी आहे. हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो."


याचबरोबर, कोविड सेंटरविषयी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, डीआरडीओ, गृह मंत्रालय आणि टाटा सन्स अँड इंडस्ट्रीज सह अनेक संघटनांनी सोबत मिळून हे हॉस्पिटल तयार केले आहे. हे हॉस्पिटल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या दिशा-निर्देशांनुसार तयार करण्यात आले आहे. जिथे आपण कोरोना रुग्णांना चांगला उपचार देऊन आजारापासून वाचवत आहोत, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. या कोविड केअर सेंटरला 11 दिवसात तयार केले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी या हॉस्पिटलचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. 

भारताने सीमावर्ती भागात चीनच्या बरोबरीने लष्काराचे जवान तैनात केले आहेत. एअरफोर्स सुद्धा पूर्णपणे लष्कराच्या सहकार्याने चीनच्या आव्हानाचा सामना करत आहे. दुसरीकडे, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. 


याचबरोबर, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही रविवारी सकाळी ट्विट केले. "भारत इतिहासाच्या अत्यंत नाजूक वळणावर जात आहे. आम्हाला एकाच वेळी बर्‍याच अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे. परंतु, आपल्याला ज्या आव्हानांचा सामना करायचा आहे. त्यासाठी आपला निर्धार पक्का असायला पाहिजे." असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सीमेवरुन डिसएंगेजमेट संरदर्भात म्हटले आहे. मात्र, डी-एस्केलेशनला बराच कालावधी लागू शकेल. कारण PLA दोन्ही सरकारांमधील सुरू असलेली चर्चा मान्य करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. ते बैठकीमध्ये शांततेबद्दल चर्चा करतात. मात्र, गलवान घाटी, गोगरा, हॉट स्प्रिंग्ज आणि पांगोंग त्सोपासून मागे हटत नाहीत. दोन्ही देशांच्या सैन्याला एलएसीपासून माघार घेण्यासाठी बराच काळ लागेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिनी सैन्य मोठ्या संख्येने पायाभूत सुविधांसह गलवान आणि पांगोंग त्सो येथे उपस्थित आहे.

चीनच्या PLAच्या कुरापती लक्षात घेऊन भारताने आपली खबरदारी वाढविली आहे. PLAच्या कोणत्याही आव्हानांना सामना करण्यासाठी लष्कर आणि हवाई दल सज्ज आहेत. 15 जून रोजी गलवानमध्ये झालेल्या चकमकीनंतर जवानांचा उत्साह वाढला आहे. एका मिलिट्री कमांडरने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, “आम्हाला लढाई सुरू करायची नाही पण दुसर्‍या बाजूने आक्रमकता दाखवली गेली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल.”

आणखी बातम्या...

मुलानं पब्जीच्या नादात उडवले 16 लाख; वडिलांनी धडा शिवण्यासाठी त्याला लावलं 'या' कामाला...

BSNLचा भन्नाट प्लॅन! 90 दिवसांपर्यंत दररोज मिळणार 5GB डेटा

मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा    

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

Web Title: Rajnath Singh We Are Ready On Border When Asked About China Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.