पंतप्रधान नव्हे सैन्यच पाकला उत्तर देणार - राजनाथ सिंह
By admin | Published: October 9, 2014 12:02 PM2014-10-09T12:02:39+5:302014-10-09T12:02:39+5:30
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला आता पंतप्रधानांनी उत्तर द्यायची गरज नसून भारतीय सैन्यच त्यांना उत्तर देत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला आता पंतप्रधानांनी उत्तर द्यायची गरज नसून भारतीय सैन्यच त्यांना उत्तर देत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आम्ही देशाचे मस्तक खाली झुकू देणार नाही असे आश्वासनही राजनाथ सिंह यांनी दिले आहे.
पाकिस्तानने शस्त्रसंधींचे उल्लंघन करण्याची मालिका गुरुवारीही सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांसमोर केंद्र सरकारची भूमिका मांडली. 'पंतप्रधान सीमा रेषेवरील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आमचे सैन्य त्यांना प्रत्युत्तर देत आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीदेखील पाकला खडसावले आहे. 'सीमारेषेवर गोळीबार सुरु ठेवणे हे पाकला महागात पडू शकते' असे अरुण जेटलींनी म्हटले आहे. गोळीबार बंद झाल्यावर चर्चा होऊच शकत नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला.