राजकीय प्रवेशाबद्दल स्वत: रजनीकांतच निर्णय घेतील - द्रमुक
By admin | Published: May 16, 2017 10:55 AM2017-05-16T10:55:08+5:302017-05-16T10:55:08+5:30
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी तब्बल नऊ वर्षांनी काल थेट चाहत्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना रजनीकांत यांनी राजकीय भाष्य केले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 16 - दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी तब्बल नऊ वर्षांनी काल थेट चाहत्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना रजनीकांत यांनी राजकीय भाष्य केले होते. त्यावर द्रमुकने राजकारणात प्रवेश करायचा कि, नाही ते सर्वस्वी रजनीकांत यांच्यावर अवलंबून आहे. ते त्यांनाच ठरवूं दे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तामिळनाडू विधानसभेचे विरोधीपक्षनेते एम.के.स्टालिन यांनी या विषयावर कोणतीही व्यक्तीगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
रजनीकांत यांनी 1996 साली द्रमुक आघाडीला पाठिंबा दिला होता. आज रजनीकांत यांना त्यावेळी पाठिंबा देऊन पाण चूक केली असे वाटत आहे. 21 वर्षांपूर्वी एका राजकीय आघाडीला पाठिंबा देऊन आपण चूक केली होती. तो एक राजकीय अपघात होता असे द्रमुकचे नाव न घेता रजनीकांत काल म्हणाले.
माझे आयुष्य देवाच्या हातात आहे. माझ्यासाठी त्याने पुढे काय ठेवले आहे याची मला माहिती नाही. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला नाही तर, निराश होऊ नका असे रजनी म्हणाले. रजनीकांत चार दिवस 17 जिल्ह्यातील त्याच्या चाहत्यांना भेटून त्यांच्यासोबत व्यक्तीगत फोटो काढणार आहेत.
सोमवारी सकाळी चेन्नईच्या राघवेंद्र हॉलमध्ये त्यांनी चाहत्यांची भेट घेतली.लाखो लोकांच्या गळयातील ताईत असलेल्या रजनीकांतबरोबरची भेट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रजनीच्या 200 ते 250 फॅन्सना या कार्यक्रमाचे पासेस देण्यात आले आहेत. 2008 साली अशा प्रकारने रजनीने चाहत्यांशी थेट संवाद साधला होता.