राजपूत करणी सेनेचा पद्मावतला विरोधच, भारत बंदची घोषणा; प्रसुन जोशी, हरिश साळवे यांना धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:45 AM2018-01-21T00:45:37+5:302018-01-21T00:45:50+5:30

'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राजपूत करणी सेना व काही भाजपाशासित राज्ये प्रयत्न करीत असून, राजस्थान सरकारने चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर २५ जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा राजपूत करणी सेनेने केली आहे. त्याच दिवशी हा चित्रपट देशभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Rajput Karani Sena's opposition to Padmavat; Prasun Joshi, Harish Salve threaten | राजपूत करणी सेनेचा पद्मावतला विरोधच, भारत बंदची घोषणा; प्रसुन जोशी, हरिश साळवे यांना धमक्या

राजपूत करणी सेनेचा पद्मावतला विरोधच, भारत बंदची घोषणा; प्रसुन जोशी, हरिश साळवे यांना धमक्या

googlenewsNext

नवी दिल्ली : 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राजपूत करणी सेना व काही भाजपाशासित राज्ये प्रयत्न करीत असून, राजस्थान सरकारने चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर २५ जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा राजपूत करणी सेनेने केली आहे. त्याच दिवशी हा चित्रपट देशभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
करणी सेनेने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांना जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये येऊ देणार नाही आणि भन्साळी यांच्या एकाही चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानात होऊ देणार नाही, अशी धमकीच दिली आहे. पद्मावतच्या प्रदर्शनास परवानगी देणाºयांना व समर्थन करणाºयांना आम्ही जयपूरमध्ये प्रवेश करू देणार
नाही, असे करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह म्हणाले.
पद्मावतच्या निर्मात्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांनाही करणी सेनेच्या नावाने धमकी आली आहे. एका अज्ञात इसमाने त्यांच्या कार्यालयात फोन करून, पद्मावतच्या बाजूने बोलू नका, अशी धमकी दिली असून, त्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. मेवाडच्या राजघराण्यातील महाराज महेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पत्र लिहून, चित्रपटाचे इतिहासाचे विकृत चित्रण केले आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात यावी आणि राज्यात हिंसाचार टाळावा, अशी विनंती केली आहे.
दरम्यान पद्मावतसाठी अभिनेता अक्षयकुमार याने आपल्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे, असे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)

बंदीसाठी प्रयत्न सुरूच
राजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्याची इच्छा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून, ते चित्रपटावर बंदी घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे थिएटर मालकांनीच तो प्रदर्शित करू नये, असे प्रयत्न काही राज्य सरकारांतर्फे सुरू असल्याचे कळते. गुजरातमधील मल्टीप्लेक्स मालकांच्या संघटनेने आम्ही पद्मावत दाखवणार नाही, असे जाहीर केले आहे.

भन्साळी यांचे निमंत्रण : करणी सेना सातत्याने धमक्या देत असली तरी संजय लीला भन्साळी यांनी संघटनेचे नेते लोकेंद्र सिंह कलवी
यांना हा चित्रपट पाहण्यास येण्याचे निमंत्रण दिले आहे. कलवी यांनी ते मान्य केले आहे. पण संघटनेच्या इतर नेत्यांनाही बोलावण्यात यावे आणि चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सांगू, तसे करावे, असे कलवी यांनी भन्साळी
यांना सांगितल्याचे कळते.

Web Title: Rajput Karani Sena's opposition to Padmavat; Prasun Joshi, Harish Salve threaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.