राजूच्या कुटुंबावर ‘सेबी’ची बंदी
By Admin | Published: September 12, 2015 03:32 AM2015-09-12T03:32:16+5:302015-09-12T03:32:16+5:30
‘सत्यम’ घोटाळ्यातील राजू व कुटुंबियांनी १८०० कोटी रुपये भरण्याचा आदेश दिल्यानंतर ‘सेबी’ ने या कंपनीशी निगडित सर्वांवरच शेअर बाजारात व्यवसाय करण्यास सात वर्षांसाठी बंदी घातली आहे.
नवी दिल्ली : ‘सत्यम’ घोटाळ्यातील राजू व कुटुंबियांनी १८०० कोटी रुपये भरण्याचा आदेश दिल्यानंतर ‘सेबी’ ने या कंपनीशी निगडित सर्वांवरच शेअर बाजारात व्यवसाय करण्यास सात वर्षांसाठी बंदी घातली आहे.
शेअर बाजारात याबाबत ‘सेबी’ ने सूचना प्रसारित केली आहे. बंदी घालण्यात आलेल्यात राजू यांची आई आय. बी. अप्पल नरसम्मा, त्यांचे दोन पुत्र राजू आणि रामा राजू ज्युनिअर, त्यांचे भाऊ सूर्यनारायण राजू, बी. झांशी राणी (सूर्यनारायण यांची पत्नी), चिंतलपती श्रीनिवास (सत्यमचे तत्कालीन संचालक), चिंतलपती होल्डिंग्स प्रा. लि. आणि एस.आर.एस.आर. होल्डिंग्स (राजू बंधू नियंत्रित) यांचा समावेश आहे.
‘सेबी’ ने कालच या घोटाळेबाजांना १८०० कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला होता. शिवाय १५०० कोटी रुपये व्याजही द्यावे लागणार आहे. हा आदेश गुरुवारीच जारी करण्यात आला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी ‘सेबी’ने या सर्वांवर बंदी घातली.
घालण्याचा आदेश काढला.
हे प्रकरण सात वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. ७ जानेवारी २००९ रोजी या घोटाळ्याची कबुली दिली होती. त्यावेळी कॉर्पोरेट जगतातील हा एक मोठा घोटाळा समजला जात होता.