राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावरून गदारोळ, काँग्रेसची दुटप्पी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 05:54 PM2018-01-03T17:54:09+5:302018-01-03T17:59:57+5:30
लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकचं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे.
नवी दिल्ली- लोकसभेत मंजूर झालेलं तिहेरी तलाकचं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. तिहेरी तलाक विधेयक सादर करताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला आहे.
मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं या विधेयकातील अनेक तरतुदींवर तीव्र आक्षेप घेतला आहे. इतर विरोधी पक्षांनीही काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला आहे. विरोधकांच्या ब-याचशा सदस्यांनी या विधेयकाला स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या गदारोळाला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
काही जण विनाकारण विरोधाच्या नावाखाली या विधेयकाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गदारोळानंतर राज्यसभा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यानं भाजपालाही विधेयकाला मंजुरी मिळवून देण्यात अडचणी आल्या आहेत.
Even y'day, triple talaq happened in UP. Congress which supported #TripleTalaqBill in Lok Sabha, took a completely divergent view in Rajya Sabha. They supported it in LS in compulsion since they were less in no. Let the country know Cong' hypocrisy & double standard: RS Prasad pic.twitter.com/9UgXx3dBby
— ANI (@ANI) January 3, 2018
महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘तिहेरी तलाक’ची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी (28 डिसेंबर 2017)बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर करून घेतले होते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यात भाजपाला अपयश आलं आहे.