Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:43 AM2022-05-30T10:43:15+5:302022-05-30T10:49:57+5:30

Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथ यांच्या पाठिंब्यावर सलग चारवेळा गोरखपूरमधून विधानसभा निवडणूक जिंकणारे डॉ. राधामोहन अग्रवाल यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Rajya Sabha Election: BJP Ex MLA Dr. Radhamohan Agarwal got Rajya Sabha ticket | Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी

Rajya Sabha Election: योगी आदित्यनाथांसाठी सोडली गोरखपूरची जागा, आता पक्षाने दिली थेट राज्यसभेची उमेदवारी

googlenewsNext

गोरखपूर: भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 6 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरातील माजी आमदार डॉ. राधामोहन अग्रवाल यांचेही नाव या यादीत आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत डॉ. राधामोहन अग्रवाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूर शहराची जागा सोडली होती. या जागेवर ते 2002 पासून विजयी होत होते. राधामोहन अग्रवाल यांनी गोरखपूर शहरातून भाजपच्या तिकिटावर सलग चार वेळा निवडणूक जिंकली होती.

गोरखपूर शहरातील सीटवर गोरखनाथ मंदिराचा प्रदीर्घ काळापासून प्रभाव आहे. अग्रवाल यांना मंदिर आणि गोरक्षपीठाधिश्वर म्हणजेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही पाठिंबा मिळत आलाय. पण 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा त्यांना योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ही जागा सोडावी लागली. असे म्हटले जाते की 2002 मध्ये सीएम योगींच्या मदतीनेच डॉ. राधामोहन अग्रवाल यांना विधानसभा निवडणुकीत हिंदू महासभेचे तिकीट मिळाले होते. निवडणूक जिंकून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर 2007 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कोण आहेत डॉ राधामोहन अग्रवाल
डॉ. राधामोहन अग्रवाल यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1964 रोजी गोरखपूर येथे झाला होता. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून 1976 मध्ये एमबीबीएस आणि 1981 मध्ये बालरोगशास्त्रात एमडी मिळवले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांची राजकारणातील सक्रियता वाढली होती. प्रथम 1974 मध्ये ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि नंतर बीएचयू शिक्षक संघटनेचे सचिव झाले. 1998 मध्ये प्रथमच गोरक्षपीठाचे तत्कालीन उत्तराधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या मदतीने अग्रवाल यांना गोरखपूरचे निवडणूक समन्वयक बनवण्यात आले. 

Web Title: Rajya Sabha Election: BJP Ex MLA Dr. Radhamohan Agarwal got Rajya Sabha ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.